घरमहाराष्ट्रपुणेबंडखोर आमदारांनी हटवला ठाकरेंचा फोटो, यावर खासदार विनायक राऊत म्हणतात...

बंडखोर आमदारांनी हटवला ठाकरेंचा फोटो, यावर खासदार विनायक राऊत म्हणतात…

Subscribe

बंडखोर आमदारांनी ठाकरेंचा फोटो हटवले. यानंतर खासदार विनायक राऊत यांनी टीका केली.

शिवसेनेचे बंडखोर आमदार आपल्या कार्यालयात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा फोटो काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या जागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात येत आहे. याची सुरूवात औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांच्यापासून झाली आहे. यावर खासदार विनायक राऊत यांनी टीका केली.

खासदार विनायक राऊतांची टीका –

- Advertisement -

या प्रकारानंतर आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी टीका केली आहे. गद्दार आमदारांच्या कार्यालयात उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो नकोतच, अशा शब्दात टीका केली आहे. अशा आमदारांमध्ये उद्धव साहेब आणि आदित्य ठाकरे यांना अडकावयाचे नाहीच, असेही विनायक राऊत म्हणाले.

बापू म्हणजे नौटंकी आमदार –

- Advertisement -

विनायक राऊत यांनी बंडखोरांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आव्हान वाटू लागल्याने त्यांनी शिवसेना फोडल्याचा आरोपही विनायक राऊत यांनी केला. आमदार शहाजी बापू पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. शहाजी बापू म्हणजे नौटंकी आमदार आहे, त्यांची ही शेवटची आमदारकी असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

शिरसाट काय म्हणाले –

माझ्या कार्यालयात मी जास्त फोटो लावत नाही. आदित्य ठाकरे यांचा फोटो सुद्धा माझ्या कार्यलयात नव्हता.मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करत असल्याने त्यांचा फोटो असणे आवश्यक आहे. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचा फोटो माझ्या कार्यालयात असून, तो आयुष्यभर कधीही हलणार नाही. दिघे साहेब यांना आम्ही मानतो त्यामुळे त्यांचा फोटो आहे. तसेच जे लोकं रोजच आम्हाला गद्दार, बंडखोर म्हणतात त्यांचे फोटो कसे लावणार?, ज्या दिवशी ते आम्हाला चांगले म्हणतील त्या दिवशी त्यांचा सुद्धा फोटो लावू असे शिरसाट म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -