Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र MPSC 2020 Exam : एमपीएससीची मुख्य परीक्षा ४ डिसेंबरला, 'या' सहा केंद्रांवर...

MPSC 2020 Exam : एमपीएससीची मुख्य परीक्षा ४ डिसेंबरला, ‘या’ सहा केंद्रांवर होणार परीक्षा

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या (MPSC 2020 Main Exam) मुख्य परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० दिनांक ४, ५ आणि ६ डिसेंबर, २०२१ रोजी होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वेळापत्रक जारी केलं आहे. तसेच, अधिक तपशिलासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील अधिसूचनेचे अवलोकन करावं, असे देखील आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.

आयोगाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या सेवेतील विविध संवर्ग/ सेवांमधील भरतीकरीता आयोगामार्फत दिनांक २१ मार्च २०२१ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० च्या दिनांक ६ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालाआधारे, मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२०, दिनांक ४, ५ आणि ६ डिसेंबर २०२१ रोजी अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोना विषाणू संसर्ग आणि आरक्षणाच्या मुद्यामुळं परीक्षा लांबणीवर पडली होती. कोरोनाचं कारण देत आयोगानं परीक्षा लांबणीवर टाकल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुण्यासह राज्यभरात चक्काजाम आंदोलन केल्यानंतर परीक्षा २१ मार्चला सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अशा दोन सत्रात ही परीक्षा झाली होती. राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०चा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यात ३ हजार २१४ उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली असून, मुख्य परीक्षेची अधिसूचना स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाने दिली होती.

अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेची तारीखही जाहीर

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचीही तारीख जाहीर करण्यात आली आहे. अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचे आयोजन येत्या 18 डिसेंबर रोजी केले जाईल. विद्यार्थी मुख्य परीक्षेची तारीख जाहीर करण्याची मागणी आयोगाकडे करत होते. एमपीएससी आयोगाने या तारख्या जाहीर केल्या आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisement -