घरताज्या घडामोडीMPSC उमेदवारांना मिळणार उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी, अशी पाहा वेबसाईटवर माहिती

MPSC उमेदवारांना मिळणार उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी, अशी पाहा वेबसाईटवर माहिती

Subscribe

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २७ मार्च २०२१ रोजी महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना पारदर्शक माहिती आणि निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आता विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांबाबतची माहिती आणि निकाल एमपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २७ मार्च २०२१ रोजी आयोजित महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा, २०२० करिता उपस्थित सर्व उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज निकालाकरिता गृहित धरलेले एकूण गुण व उमेदवाराच्या संबंधित प्रवर्गांकरिताच्या गुणांची किमान सीमांकन रेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES मधील View Marksheet या वेबलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

- Advertisement -

अशा प्रकारे पाहा संकेतस्थळावरील माहिती

-आयोगाच्या https://mpsc.gov.in/ या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES मधील View Marksheet: लिंकवर क्लिक करावे.
-उपलब्ध होणाऱ्या परीक्षांच्या यादीमधून संबंधित परीक्षेची निवड करावी.
-परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाइल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी प्रविष्ट करुन लॉगीन करावे.
-लॉगीन केल्यानंतर गुणपत्रक व स्कॅन उत्तरपत्रिका उपलब्ध करून घेता येईल. विहित कार्यपध्दतीनुसार गुणपत्रक व स्कॅन उत्तरपत्रिका उपलब्ध करून घेताना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास आयोगाच्या १८००१२३४२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क साधता येईल. उपरोक्त सुविधा ही वरील वेबलिंकवर दिनांक 10 नोव्हेंबर, 2021 पर्यंत उपलब्ध राहील.

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -