Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र MPSC Exam 2020 : राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, आता प्रतीक्षा मुख्य...

MPSC Exam 2020 : राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, आता प्रतीक्षा मुख्य परीक्षेची

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य पूर्व परीक्षा २०२० चा निकाल नुकताच जाहीर झाला. आयोगाने २०० जागांसाठी ही परीक्षा घेतली होती. यात उत्तीर्ण ३ हजार २१४ उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. २०० पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट अ वर्गाची परीक्षा घेतली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहा वेळा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

कोरोना संसर्ग आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलल्याने उमेदवारांनी पुण्यासह राज्यभरात चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे आयोगाने २१ मार्च रोजी पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल अखेर सोमवारी जाहीर झाला. मात्र उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आता मुख्य परीक्षेची प्रतिक्षा आहे. विद्यार्थ्यांची नावे या अधिकृत यादीत पाहू शकता

- Advertisement -

https://mpsc.gov.in/downloadFile/english/3964

- Advertisement -

राज्य सेवा आयोगाने पूर्व परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात सर्वाधिक १ हजार ७२ उमेदवार पुण्यातील असल्याचे दिसून आले. त्याखालोखाल औरंगाबादमधील २४१, नाशिकमधील २२०, कोल्हापूरमधील १६९, अहमदनगरमधील १७७ उमेदवार आहेत. तसेच प्रवर्गनिहाय पात्रता गुणही जाहीर करण्यात आले आहेत.

२०१९ च्या लोकसेवा आयोगाच्या नियुक्त्यांसाठी उमेदवार आक्रमक 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या २०१९ च्या राज्यसेवा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या रखडल्याने राज्यात गदारोळ निर्माण झाला. राज्यसेवा परीक्षा घेऊन दोन वर्षे उलटून गेली तरी नियुक्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 10 सप्टेंबर पुर्वी नियुक्त्या द्या, अन्यथा एमपीएससी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचा आत्मदहनाचा इशारा विद्यार्थ्यांच्यां वतीनं देण्यात आला आहे. 413 पदांसाठी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती.


Maharashtra CET Exam 2021 : राज्यात १५ सप्टेंबरपासून सुरु होणार MHT-CET परीक्षा – उदय सामंत


 

- Advertisement -