एमपीएससीच्या गट क साठी २०० पदांची भरती; आताच अर्ज करा, फक्त २० दिवस उरले

पूर्व परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. त्यासाठी mpsconline.gov.in या संकेतस्थळावर २२ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करू शकता.

MPSC

एमपीएससीची (MPSC) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट क (Maharashtra Group C) च्या २२८ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी ५ नोव्हेंबर रोजी पूर्व परीक्षा होणार आहे. पूर्व परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. त्यासाठी mpsconline.gov.in या संकेतस्थळावर २२ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करू शकता.

हेही वाचा एमपीएससीच्या परीक्षा पॅटर्नमध्ये सुधारणा, अधिकृत संकेतस्थळावर बदलाच्या सर्व सूचना

एमपीएससी गट क साठी ५ नोव्हेंबर २०२२ रोजी पूर्व परीक्षा होणार आहे. जे उमेदवार पूर्व परीक्षा पास होतील त्यांच्यासाठी फेब्रुवारी किंवा मार्च या महिन्यात मुख्य परीक्षा होतील. पूर्व परीक्षा १०० गुणांची असेल तर, मुख्य परीक्षा २०० गुणांची असणार आहे. यानंतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार या परीक्षेसाठी उमेदवारी अर्ज भरू शकतात.

यासाठी आरक्षण मिळणार असून शैक्षणिक योग्यतेसाठी तुम्ही नोटीस तपासू शकतात. सामान्य वर्गातील उमेदवारीसाठी ३९४ रुपये शुल्क आहे तर आरक्षण असलेल्या उमेदवारांना शुल्कात सूट मिळणार आहे.

जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हे लक्षात ठेवा

  • महिला, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग आणि अनाथांसाठीचे समांतर आरक्षण शासनाने यांसदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहील.
  • महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी असल्याबाबत तसेच नॉन क्रिमिलेअरमध्ये मोडत असल्याचा स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे.
  • विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क) आणि भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल.