घरताज्या घडामोडीMPSC Exam : अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ४ सप्टेंबरला होणार, लोकसेवा आयोगाचा...

MPSC Exam : अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ४ सप्टेंबरला होणार, लोकसेवा आयोगाचा निर्णय

Subscribe

महाराष्ट्रा लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक ११ एप्रिल २०२१ रोजी नियोजित विषयांकित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट -ब संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा रविवार ९ एप्रिल २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. पंरतू राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सदर परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आली होती. ९ एप्रिल रोजी होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढेकलण्यात आली होती. राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने अराजपत्रित संयुक्त पुर्व परीक्षेला परवानगी दिली आहे. यानुसार आता सुधारीत प्रसिद्धीपत्रक काढून लोकसेवा आयोगाची अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ४ सप्टेंबरला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धी पत्रक जारी करत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा चार सप्टेंबरला होणार असल्याची माहिती दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे की, महाराष्ट्रा लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक ११ एप्रिल २०२१ रोजी नियोजित विषयांकित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट -ब संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आलेल्या पत्रावरून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

- Advertisement -

राज्य सरकारच्या आपवत्ती व्यवस्थापन विभाग, महसूल व वन विभाग यांच्याकडून ३ ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या परवानगीनुसार शनिवारी ४ सप्टेंबर २०२१ रोजी अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पुर्व परीक्षा २०२०चे आयोजन करण्यात येत आहे. कोविड विषाणूच्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीवर शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने वेळोवेळी आढावा घेण्यात येणार आहे. तसेच याबाबतची अधिक माहिती संकेत स्थळावर देण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -