एमपीएससीचे नवे वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार मुलाखती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयोगाने आपल्या ट्वीटर हँडलवरुन आणि संकेतस्थळावर हे वेळापत्रक शेअर केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयोगाने आपल्या ट्वीटर हँडलवरुन आणि संकेतस्थळावर हे वेळापत्रक शेअर केले आहे. आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार २८ फेब्रुवारी रोजी मुंबईत मुलाखती होणार आहेत. (Mpsc Exam Timetable Mpsc Mains Interview In Pune Declared)

आयोगाच्या नव्या तारखेनुसार २८ फेब्रुवारी रोजी मुंबईत या मुलाखती होणार आहेत. याआधी मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या २३ आणि २४ फेब्रुवारी २०२३ रोजी पुण्यात मुलाखती घेण्यात येणार होत्या. परंतु, या वेळापत्रकामध्ये आता बदल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ साठीच्या मुलाखती नियोजित केल्या आहेत. मुंबईतल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्य़ा कार्यालयात या मुलाखती घेण्यात येणार आहेत.

दरम्यान, पुण्यात आज (सोमवार 20 फेब्रुवारी) सकाळी 10 वाजताच्या सुमारास बालगंधर्व चौक येथे एमपीएससी निर्णयाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थिती होते. एमपीएससीचा नवा पॅटर्न २०२५ पासून लागू करण्याबाबत आयोगाने अंबलबजावणी अद्याप केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारले आहे.

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात एमपीएससीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. पहिल्या टप्प्यात ‘राज्यसेवा मुख्य नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करावा’ या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलने केली. त्यानंतर एमपीएससी आयोगाने जाहिर केल्याप्रमाणे बदल हा २०२३ पासूनच लागू करावा यासाठीही विद्यार्थ्यांनी आंदोलने केली.


हेही वाचा – फडणवीसांचे विश्वासू ब्रिजेश सिंह सीएमओत, तर परदेशीही ‘मित्र’चे सीईओ