Homeमहाराष्ट्रMPSC Exam : परीक्षा पारदर्शकपणेच होणार, आयोग ठाम, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे...

MPSC Exam : परीक्षा पारदर्शकपणेच होणार, आयोग ठाम, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Subscribe

महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे होणार असून येत्या 2 फेब्रुवारी 2025 रोजी ही परीक्षा घेण्यास आयोग सज्ज आहे. या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी अफवांवर विश्वास न ठेवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी केले आहे.

MPSC Exam : मुंबई : महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे होणार असून येत्या 2 फेब्रुवारी 2025 रोजी ही परीक्षा घेण्यास आयोग सज्ज आहे. या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी अफवांवर विश्वास न ठेवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी केले आहे. दरम्यान, या पूर्व परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतो, 40 लाख रुपये द्या, असं म्हणत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आमिष दाखवण्याचे प्रकार नुकतेच पुण्यात घडले आहेत. परीक्षेपूर्वीच आमिष दाखवणारे फोन आल्याची धक्कादायक माहिती काही वृत्तवाहिन्यांच्या हाती आली आहे. तशा बातम्या देखील गुरुवारी दिवसभर चालवल्या गेल्या. मात्र, या सगळ्या अफवा आहेत, या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन आयोगाने केले आहे. (mpsc exams will be held transparently commission insists appeals not to believe rumours)

संशयित व्यक्ती एमपीएससी उमेदवाराला पेपरचे आमिष दाखवणारे तीन कॉल उमेदवारांना आलेले आहेत. तुम्ही गट ब परीक्षेसाठी अर्ज केला आहे. या पदाची तयारी करत असाल, तर आपल्यासाठी एक ऑफर आहे. आम्ही या परीक्षेची प्रश्नपत्रिका 2 फेब्रुवारी पूर्वी उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी 40 लाख रुपये द्यावे लागतील. आपल्याला विश्वास नसेल तर या परीक्षेला एकही रुपया नाही दिला तरी चालेल, असे ढोबळमानाने या संवादाचे स्वरूप होते.

या फोन कॉलमुळे विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली असून नोकर भरतीत मोठा घोटाळा होणार असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या फोन कॉलची सत्यता पडताळण्यासाठी संबंधीत विद्यार्थ्यांकडून एमपीएससीकडे अर्ज देखील केला जाणार आहे.

यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बेलापूर, नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. खरात यांनी ही माहिती दिली. डॉ. खरात म्हणाल्या की, 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024’ या परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिकांची उपलब्धता करुन देण्यासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या चुकीच्या आहेत. सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत आणि अशा कोणत्याही माहितीमध्ये तथ्य नाही. काही भ्रमणध्वनी क्रमांकांवरून उमेदवारांना प्रश्नपत्रिका मिळवण्याचे आमिष दाखवून पैशाची मागणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा – Supreme Court : महाकुंभातील चेंगराचेंगरी विरोधात जनहित याचिका, अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि पोलीस आयुक्त, पुणे यांच्या तर्फे या प्रकरणी कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारांना अशा प्रकारचे दूरध्वनी आल्यास, त्यांनी [email protected] या ईमेलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी 2 लाख 86 हजार उमेदवार परीक्षा देणार आहेत. सर्व परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त आणि व्यवस्था ठेवण्यात आली असल्याचेही डॉ. खरात यांनी सांगितले.

हेही वाचा – DCM Eknath Shinde : मुंबईकरांचे प्रशस्त घरांचे स्वप्न पूर्ण होणार, काय म्हणाले उपमुख्यमंत्री शिंदे?