घरताज्या घडामोडीMPSC: राज्य सेवा पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करण्यास दोन दिवसांची मुदतवाढ

MPSC: राज्य सेवा पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करण्यास दोन दिवसांची मुदतवाढ

Subscribe

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ करिता अर्ज सादर करण्यासाठी २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ३१ ऑक्टोबर २०२१ ही अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख होती परंतु आता २ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. एमपीएससीकडून २९० पदांकरता ८ ऑक्टोबर रोजी जाहीरात काढली असून महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ मध्ये होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्विटरवर ट्विट करत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली असल्याची माहिती दिली आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ करिता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात येत आहे. असे लोकसेवा आयोगाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना २ वर्षांची संधी द्या, खासदार संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -