घरताज्या घडामोडीअखेर MPSC परीक्षा पुन्हा पुढे ढकलली!

अखेर MPSC परीक्षा पुन्हा पुढे ढकलली!

Subscribe

यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) पूर्वपरीक्षेचा मुहूर्त काही स्थिर होण्याचं नाव घेत नाहीये. नियमित वेळापत्रकानुसार दरवर्षी या परीक्षा एप्रिल महिन्यात होता. मात्र या वर्षी कोरोनाचं संकट समोर असताना या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. एप्रिल महिन्यात ४ तारखेला ही परीक्षा (Competitive Exam) होणार होती. मात्र, कोरोनामुळे ती पुढे ढकलून २६ एप्रिल करण्यात आली. पण कोरोनाचं संकट वाढल्यामुळे २६ एप्रिलची परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली होती. अनिश्चित काळासाठी या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यानंतर अखेर १७ जून रोजी राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षेचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार १३ सप्टेंबर रोजी राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर रोजी तर अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर रोजी होणार असं जाहीर करण्यात आलं होतं. पण आता पुन्हा एकदा त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा आता २० सप्टेंबर रोजी होणार आहेत. पण त्यासाठी कोरोना हे कारण ठरलं नसून नीटच्या (NEET) परीक्षा कारणीभूत ठरल्या आहेत (Timetable).

mpsc exam postponed letter

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -