MPSC Result : एमपीएससीचा निकाल जाहीर, प्रमोद चौगुले राज्यात प्रथम

Results of departmental pre-examination for the post of Sub-Inspector of Police announced

एमपीएससी तर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षांचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परिक्षेत प्रमोद चौगुलेंने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. मुलींमध्ये रुपाली माने पहिली आली आहे. तर गिरीश परेकर मागासवर्ग प्रवर्गातून राज्यात पहिला आला आहे.

4,5 आणि 6 डिसेंबरला झाली होती परीक्षा –

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 4,5 आणि 6 डिसेंबरला राज्यसेवा मुख्य परीक्षेच घेण्यात आल्या होत्या. त्याचा आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निकालात एकून 200 उमेदवारांची शिफारस करण्यात आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल ही जाहीर – 

दरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2021 (UPSC 2021) चा अंतिम निकाल जाहीर काल (सोमवारी) झाला. यंदाच्या युपीएससी परीक्षेत श्रुती शर्माने पहिला क्रमांक पटकावला आहे. युपीएससी 2021 परीक्षेत पहिल्या चार स्थानांवर मुलींनीच बाजी मारली आहे. यात महाराष्ट्रातील 40 हून अधिक जणांना यश आले आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार आयोगाच्या upsc.gov.in या वेबसाइटला भेट देऊन आपला निकाल पाहू शकतात. दरम्यान यंदा श्रुती शर्मासह अंकिता अग्रवाल, गामिनी सिंगला, ऐश्वर्या शर्मा टॉपर्स ठरल्या आहेत.