घरताज्या घडामोडीसरकारचा निषेध! आरक्षणाच्या निर्णयाबाबत MPSCच्या विद्यार्थ्यांकडून गोट्या, विटी दांडू खेळून अनोखं आंदोलन

सरकारचा निषेध! आरक्षणाच्या निर्णयाबाबत MPSCच्या विद्यार्थ्यांकडून गोट्या, विटी दांडू खेळून अनोखं आंदोलन

Subscribe

राज्यात दोन वर्षानंतर दहीहंडी उत्सव ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. मुंबईसह ठाण्यात गोविंदा पथकांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभी नाका दहीहंडी उत्सवात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी गोविंदांशी संवाद साधला आणि एक महत्वाची घोषणा केली. महाराष्ट्रातील गोविंदांना सरकारी नोकरीत 5 टक्के आरक्षण मिळेल अशी ती घोषणा होती. दरम्यान, पाच टक्के क्रिडा आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी गोट्या, विटी दांडू खेळून अनोख्या पद्धतीने आंदोलन करत निषेध केला आहे.

राज्य सरकारने दहीहंडीला खेळाचा दर्जा देऊन गोविंदांना आरक्षणाची घोषणा केली. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक झाले असून त्यांनी विटी दांडू, गोट्या खेळून सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. अनेक खात्यातील जागा रिक्त असतानाही त्या भरल्या जात नाहीत आणि असे निर्णय घेऊन सरकार पोरखेळ करत असल्याचं या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

काही शहरातील महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप एमपीएससी समन्वय समितीचे विद्यार्थी करत आहेत. त्याचबरोबर हा निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा देखील इशारा त्यांनी दिला आहे.

एमपीएसीच्या विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही – उदय सामंत

- Advertisement -

दहीहंडी खेळाच्या प्रकारामुळे कुठल्याही एमपीएसीच्या विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही हे खात्रीने सांगतो. 5 टक्के क्रिडा विभागाचे जे आरक्षण आहे त्यात सुरुवातीच्या क्रिडा प्रकारांवरही अन्याय होणार नाही. पण या 5 टक्क्यांच्या आरक्षणात भविष्यात साहसी खेळ म्हणून दहीहंडीचा समावेश केला जाणार आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. यासाठी एक नियमावली तयार केली जाणार आहे. नियमावली तयार करताना वयोगट, शिक्षण काय असावे याचे निकष ठरवले जाणार आहेत. तालुका, जिल्हा स्तरावर स्पर्धा असल्या पाहिजेत त्यातून टॅलेंट सर्च केले जाईल. या सर्वाचा परिपाक म्हणजे एखाद्या खेळाचा उपक्रम करत असताना पूर्वीचे जे साहसी खेळ आहेत त्यात कॉमा टाकून हा खेळ अॅड होणार आहे. यातून असे नाही की, पूर्वीच्या खेळांची मान्यता रद्द होणार आहे. त्यांना 5 टक्के आरक्षण मिळणार नाही असं होणार नाही, असं कॅबिनेट मंत्री उदय सामंत पत्रकार परिषदेत म्हणाले.


हेही वाचा : एमपीएससी विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ न देता गोविंदांना मिळणार क्रीडा आरक्षण; उदय सामंतांचे स्पष्टीकरण


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -