घरताज्या घडामोडीराज्यपाल महोदय आपण नाशिकमध्येही राजभवन बांधावे

राज्यपाल महोदय आपण नाशिकमध्येही राजभवन बांधावे

Subscribe

आरोग्य विद्यापीठाच्या कार्यक्रमप्रसंगी भुजबळांची टोलेबाजी

राज्यपाल महोदय नाशिक एक धार्मिक, सांस्कृतीक नगरी आहे येथील वातावरणही आरोग्यदायी आहे त्यामुळे आपण नाशिकलाही एक राजभवन बांधावे म्हणजे आपल्या येथे येण्याने आमची विकासकामेही लवकरात लवकर मार्गी लागतील. विद्यापीठाने नविन अभ्यासक्रमाच्या इमारतीचे कामही लवकर सुरू करावे जेणेकरून राज्यपालांच्या हस्ते या इमारतींचे उदघाटनही करता येईल असा टोला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे बघत लगावला.

महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या प्रशासकिय इमातीचे उदघाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख, पालकमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात सध्या चांगलाच कलगीतुरा रंगलेला दिसतो. त्यामुळे राज्यपालांच्या उपस्थितीत होणार्‍या सोहळयात उपस्थित महाविकास आघाडीचे मंत्री काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. यावेळी बोलतांना पालकमंत्री भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत जोरदार टोलेबाजी केली. आरोग्य विद्यापीठाच्या या उपक्रमाचे कौतुक करतांना भुजबळ म्हणाले, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाला जे जे अभ्यासक्रम सुरू करायचे आहेत ते त्यांनी या वर्षीच सुरू करण्याच्यादृष्टीने नियोजन करावे. याकरीता जे कॉलेजेस बांधायचे आहेत त्याचे लवकरात लवकर काम सुरू करावे जेणेकरून राज्यपालांच्या हस्ते या इमातीचे उदघाटन आपणांस करता येईल.

- Advertisement -

भुजबळांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देतांना राज्यपालांनी ‘तेव्हा आपणही आमच्या सोबत असायला हवे’ असा टोला लगावला. यावर भुजबळांनी ‘आम्ही तर सोबत राहूच’ असा टोला लगावताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी नाशिकमध्ये राजभवन बांधण्याचा सल्लाही भुजबळांनी यावेळी दिला. ते म्हणाले की, राज्यपाल महोदय आपण नाशिकला वारंवार येत राहा. आपल्या येण्याने येथील विकास कामांनाही गती मिळेल. नाशिक ही धार्मिक, सांस्कृती नगरी आहे. येथील वातवरणही आरोग्यदायी आहे त्यामुळे आपण नाशिकमध्येच एक राजभवन बांधले तर आपली आणि आमची वारंवार भेटही होत राहील अशी कोपरखळीही मारली. आरोग्य विद्यापीठाचे प्रश्न सोडविण्याच्यादृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोतच परंतु आता विद्यापीठ प्रशासनानेही याकरीता पुढाकार घेउन विषय मार्गी लावावेत असेही भुजबळ म्हणाले.

 

- Advertisement -

 

कोविड सारख्या महामारीने आपले सर्वांचे डोळे उघडले. त्यामुळे आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या तातडीने करा. ही महामारी पुन्हा येणार नाही असे सांगता येणार नाही. निसर्गाशी छेडछाड करण्याचे काम सुरूच आहे. वेगवेगळे कोर्सेस आपण सुरू केले आहे. परंतु इतही बाबींकडे लक्ष द्यायला हवे. आपल्याकडे व्हेंटीलेटर आहेत पण त्यांचे टेक्निशियनच नाही. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केवळ एमबीबीएस होउन चालणार नाही तर पॅरामेडीकल स्टाफवर लक्ष देणे गरजेचे आहे. कोरोनामुळे नउ महीने वाया गेली त्यामुळे यापुढे जे जे कोर्सेस राबवायचे त्याबाबत आता पुढाकार घ्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -