घरताज्या घडामोडीTET मार्फत भरती झालेल्या शिक्षकांची प्रमाणपत्र पडताळणार, राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षांची माहिती

TET मार्फत भरती झालेल्या शिक्षकांची प्रमाणपत्र पडताळणार, राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षांची माहिती

Subscribe

२०१३ पासूनच्या सर्व टीईटी मार्फत भरती झालेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे. प्रमाणपत्र पडतळण्याबाबतचे आदेश सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहिती राज्य महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्षांनी ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या अटकेनंतर शिक्षकांच्या पात्रतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. टीईटीच्या परीक्षेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये अनेक उमेदवारांनी लाच देऊन पात्रता मिळवली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्याही शिक्षणावर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. यामुळे आता २०१३ पासूनच्या सर्व टीईटी मार्फत भरती झालेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी कऱण्यात येणार आहे. प्रमाणपत्र पडतळण्याबाबतचे आदेश सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहिती राज्य महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्षांनी ही माहिती दिली आहे.

राज्यातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांची प्रमाणपत्र खरी आहेत का नाही? असा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे २०१३ पासून पात्र ठरलेल्या सर्व शिक्षकांची माहिती पुन्हा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्षांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेले सर्व प्राथमिक शिक्षक १ ते ७ साठी आणि १ ते ५ साठी सर्व शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्राची पडताळणी करण्याबाबतचे आदेश सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत. प्राथमिक शिक्षण अधिकारी, माध्यमिक शिक्षण अधिकारी, मनपाचे प्रशासन अधिकारी सर्वांना दिले आहेत. अद्याप काही माहिती राज्यातून येण अपेक्षित. अजून माहिती येत आहे. संपूर्ण माहिती प्राप्त झाली नसून येत्या ३ ते ४ दिवसांमध्ये माहिती प्राप्त होईल. माहिती मिळाल्यानंतर सर्व प्रमाणपत्रांची पडताळणी करु आणि सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना कळवणार आहोत असे अध्यक्षांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

पेपर फुटी प्रकरणात तुकाराम सुपेंना अटक

म्हाडा पेपर फुटी प्रकरणाची चौकशी सुरु असताना पोलिसांना टीईटी परीक्षेतही गैरव्यवहार झाला असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार तुकाराम सुपे यांची दिवसभर चौकशी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी त्यांना अटक कऱण्यात आले. सुपे यांच्या घरात कोट्यावधी रुपये सापडले आहेत.तसेच म्हाडा, टीईटी आणि आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्येही गैरव्यवहार झाला असल्याचे उघडकीस आले आहे. राज्यातील २०२० च्या शिक्षक पात्रता परीक्षेत जे उमेदवार अपात्र ठरले होते त्यांना पैसे घेऊन पात्र ठरवलं आहे.


हेही वाचा : पोलिसांच्या बदल्यांची ती यादी खोडसाळपणाने व्हायरल, गृहमंत्री वळसे पाटलांकडून चौकशीचा आदेश

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -