घरताज्या घडामोडीमुलुंडमधील एका पॉश सोसायटीकडून ६३.२३ लाखाची वीजचोरी, महावितरणच्या पथकाकडून वीजचोरी उघडकीस

मुलुंडमधील एका पॉश सोसायटीकडून ६३.२३ लाखाची वीजचोरी, महावितरणच्या पथकाकडून वीजचोरी उघडकीस

Subscribe

दुसरी विनामीटर केबल जोडून २ वर्षांपासून वीजचोरी करीत असल्याचे आढळून आले

मुलुंड मधील निर्मल लाईफ स्टाईल च्या नवीन बांधकाम झिरकोन को. ऑप. हाऊसिंग सोसायटीत, महावितरणच्या तपासणी दरम्यान १,७६,१०० युनिटची तब्बल रु.६३.२३ लाखाची वीजचोरी उघडकीस आली आहे.याबाबत मुलुंड पोलीस ठाण्यात विद्युत कायदा २००३, कलम १३५ अन्वये निर्मल लाईफ स्टाईल व झिरकोन को. ऑप. हाऊसिंग सोसायटीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे (एफआयआर-फि. स्था.ख.क्र.६७, वर्ष.२०२१ दि.४.०६.२०२१). याबाबत, पोलीस पुढील तपास करत आहे.

महावितरणचे अधिकारी आपल्या नियमित चेकिंगसाठी मुलुंड पश्चिम येथील निर्मल लाईफ स्टाईलच्या झिरकोन को. ऑप. हाऊसिंग सोसायटीत गेले असता वीज चोरी होत असल्याचा संशय महावितरणच्या अधिकाऱ्यांना आला. तेथील सखोल चौकशी केल्यानंतर या ३९ मजली इमारतीच्या बांधकामासाठी लागतच्या बी. एम. सी.च्या आऊट-गोइंग स्विचला, दुसरी विनामीटर केबल जोडून २ वर्षांपासून वीजचोरी करीत असल्याचे आढळून आले. सदर प्रकारणबाबत, महावितरणने मुलुंड पोलीस ठाण्यात विद्युत कायदा २००३ अन्वये कलम १३५ नुसार निर्मल लाईफ स्टाईल व झिरकोन को. ऑप. हाऊसिंग सोसायटीवर गुन्हा दाखल केला असून पोलीस याबाबत पुढील चौकशी करत आहे.

- Advertisement -

महावितरणने, झिरकोन को. ऑप. हाऊसिंग सोसायटीला दंडासोबत रु.६३.२३ लाखाची रक्कम भरण्यास सांगितले होते. सदर रक्कम ना भरल्यामुळे त्यांच्यावर दि. ४ जून २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना समोर आल्यामुळे, वीज चोरांचे धाबे दणाणले आहेत. सदर, कारवाई महावितरण मुलुंडचे कार्यकारी अभियंता दत्तात्रेय भणगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोदय उपविभागातील उप कार्यकारी अभियंता शकील पाटील, सहाय्यक अभियंता प्रशांत भानुशाली व त्यांच्या चमूतील सतीश कुलकर्णी, राजू हुलहुले, श्रीराम कोरडे, जयश्री त्रिंबके, सुनील निंबाळकर यांनी केली आहे.

त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महावितरण भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी स्वतः शाखा कार्यालयात भेट देऊन त्यांचे कौतुक केले व त्यांचे मार्गदर्शन केले. तसेच या कोरोना काळात जिद्दीने उत्तमरित्या काम करीत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ग्राहकांनी अनधिकृत विजेचा वापर टाळावा व इतरांना ही प्रामाणिकपणे विजेचा वापर करण्यास प्रोत्साहित करावे असे आवाहन मुख्य अभियंता गणेशकर यांनी केले.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -