घरताज्या घडामोडीविद्युत वाहिन्यांच्या देखभालीसाठी ड्रोन कॅमेऱ्याचा प्रयोग

विद्युत वाहिन्यांच्या देखभालीसाठी ड्रोन कॅमेऱ्याचा प्रयोग

Subscribe

पारेषण यंत्रणेंमध्ये अतिउच्च दाब वाहिन्यांचा देखभाल आणि बिघाड दुरूस्तीचे आव्हान हे पारेषण विभागासमोरील टास्क असते. वीज वाहिनीतील दोष शोधणे हे अतिशय वेळखाऊ आणि कठीण अशा स्वरूपाचे काम असते. अनेकदा बिघाड शोधताना महापारेषणसारख्या यंत्रणेचा कस लागतो. पण हे बिघाड देखभाल दुरूस्तीसाठीचे काम आता ड्रोनच्या माध्यमातून होणार आहे. महापारेषणने आपल्या यंत्रणेच्या देखभाल दुरूस्तीसाठी ड्रोन कॅमेऱ्याचा पहिलाच असा प्रयोग केला आहे. या ड्रोनच्या वापरामुळे यंत्रणेतील देखभाल आणि दुरूस्ती प्रभावी होईल असा महापारेषणच्या अधिकाऱ्यांचा विश्वास आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने आयोजित केलेल्या अति उच्चदाब वाहिन्यांच्या सर्वेक्षणासाठी वापरत असलेल्या ड्रोन कॅमेराचे प्रात्याक्षिक कोराडी औष्णिक वीज प्रकल्प अंतर्गत विद्युत विहार वसाहत कोराडी येथील पटांगणावर आयोजित करण्यात आले. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीमध्ये या ड्रोन कॅमेराचे प्रात्याक्षिक झाले. ड्रोन कॅमेराचा वापर अतिउच्च दाब वाहिन्यांच्या देखभाली करीता बिघाड शोधण्याचे साधन म्हणून कसा वापर करता येते. याचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. यामुळे होणारे फायद्याची तसेच सुलभतेची माहिती देण्यात आली. विद्युत वाहिन्यांची देखभाल व निगराणी ड्रोन कॅमेरामुळे अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

यावेळी बोलताना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, पारंपारिक पद्धतीपेक्षा नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून अति उच्चदाब वाहिन्यांची निगराणी व देखभाल करण्याची आवश्यकता आहे. या दृष्टीने पारेषण कंपनीने उचललेले हे पाऊल निश्चितच अभिनंदनीय आहे. अति उच्चदाब वाहिन्यांची भूमिका फार महत्त्वाची राहत असल्याने या वाहिन्यांची देखभाल व निगराणी आवश्यक आहे. यामुळे विद्युत हानी सुद्धा कमी होण्याची शक्यता असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.

या ड्रोन कॅमेरामुळे होणा-या फायद्याची माहिती महापारेषणच्या नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता महेंद्र वाळके यांनी यावेळी दिली. या नव्या यंत्रणेमुळे अति उच्चदाब वाहिन्यांमधील दोष व बिघाड शोधून काढण्यात मदत होईल, असेही वाळके यांनी सांगितले.या प्रात्याक्षिकाच्यावेळी महानिर्मितीचे मुख्य अभियंता प्रकाश खंडारे, राजू घुगे, राजकुमार तासकर इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -