मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा लवकरच आठ पदरी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारला दिला आहे. या प्रस्तावाला राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर कामाला सुरूवात होईल. यामुळे पुण्याकडे जाणाऱ्यांसह गोवा, सातारा, कोल्हापूर आणि कोकणाकडे जाणाऱ्यांना नागरिकांना हा मोठा दिलासा मिळेल.
मुंबई आणि पुणे या दोन शहारातील अंतर कमी करण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे बांधण्यात आला होता. यामुळे मुंबई आणि पुण्याचा प्रवासासाठी अवघे दोन ते अडीच तासांत लागतात. या एक्स्प्रेस वेवर जवळपासून 1 लाख 55 हजार वाहाने धावत असल्याची माहिती मीडिया रिपोर्टमधून मिळाली. या एक्स्प्रेस वेवर सतत वाहानांची वर्दळ वाढत असल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते. यावर पर्याय काढण्यासाठी एक्स्प्रेस वे आठ पदरी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारडे पाठविला आहे.
हेही वाचा – मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील टोल वसुलीवर किशोर कदम म्हणाले; “अरे लूट थांबवा रे…”
दोन शहरांना जोडणारा एक्स्प्रेस वे
या एक्स्प्रेस वेचे काम 2002 मध्ये पूर्ण झाले होते. हा एक्स्प्रेस वे 94.5 किमी लांबीचा आणि वेगवान असून यामुळे राज्यातील मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडला जातो. या एक्स्प्रेस वेमुळे मुंबई-पुणे 148 किमी लांबीचा प्रवास फक्त 2 तासांत होतो.