Homeताज्या घडामोडीMSRTC BUS : येत्या 5 वर्षात एसटी महामंडळ 25 हजार स्वमालकीच्या बसेस...

MSRTC BUS : येत्या 5 वर्षात एसटी महामंडळ 25 हजार स्वमालकीच्या बसेस घेणार – परिवहन मंत्री

Subscribe

स्वस्त दरात लांबचा प्रवास करण्यासाठी सर्वसामान्य प्रवासी नेहमीच एसटी महामंडळाच्या बसेसला प्राधान्य देतात. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी एसटी महामंडळांच्या ताफ्यात स्वमालकीच्या 25 हजार नव्या बसेस दाखल होणार आहेत. त्यानुसार, दरवर्षाला 5000 बसेस एसटी महामंडळाकडून खरेदी केली जाणार आहे.

मुंबई : स्वस्त दरात लांबचा प्रवास करण्यासाठी सर्वसामान्य प्रवासी नेहमीच एसटी महामंडळाच्या बसेसला प्राधान्य देतात. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी एसटी महामंडळांच्या ताफ्यात स्वमालकीच्या 25 हजार नव्या बसेस दाखल होणार आहेत. त्यानुसार, दरवर्षाला 5000 बसेस एसटी महामंडळाकडून खरेदी केली जाणार आहे. असं दरवर्षी 5000 बस प्रमाणे पुढील पाच वर्षात 25 हजार बसेस खरेदी केली जाणार आहे. स्वमालकीच्या बसेस खरेजी करण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून आज (27 जानेवारी) अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव मांडण्यात आला. त्या प्रस्तावाला अजित पवारांकडून मान्यता देण्यात आली आहे. (MSRTC BUS ST Corporation will acquire 25 thousand self owned buses in the next 5 years says Transport Minister)

“एसटी महामंडळ दरवर्षी 5000 स्वमालकीच्या बसेस खरेदी करणार आहे. दरवर्ष येत्या 5 वर्षात 25 हजार नव्या एसटी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली आहे. तसेच, हा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना परिवहन विभागाला देण्यात आली आहे”, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

“सन 2025-26 अर्थसंकल्पासाठी परिवहन विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी बोलवली होती. या बैठकीमध्ये एसटीच्या सद्यस्थितीची परिस्थितीबाबत मंत्री सरनाईक यांनी माहिती दिली. सध्या एसटी महामंडळाकडे केवळ 14 हजार 300 बसेस असून त्यापैकी 10 वर्ष पेक्षा जास्त जुन्या झालेल्या 10 हजार बसेस आहेत. त्या पुढील 3-4 वर्षात प्रवासी सेवेतून बाद होतील. या पार्श्वभूमीवर भविष्यात एसटीला आत्मनिर्भर होण्यासाठी स्वत:च्या बसेस घेणे आवश्यक आहे. त्यासाठी दरवर्षी 5 हजार नवीन लालपरी बसेस याप्रमाणे पुढील 5 वर्षांमध्ये 25 हजार लालपरी बसेस घेण्याची पंचवार्षिक योजना आखण्यात आली आहे. या योजनेच्या प्रस्तावाला अर्थमंत्र्यांनी परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच, ही मागणी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मान्य करण्यात आली. दरवर्षी 5 हजार नवीन बसेस त्यानुसार, २०२९ वर्षापर्यंत 25 हजार बसेस व 5 हजार इलेक्ट्रिक बसेस याप्रमाणे 30 हजार बसेसचा ताफा एसटीकडे तयार असेल. तसेच, भविष्यात ‘गाव तिथे एसटी…मागेल त्याला बस फेरी…’ असे आपण देऊ शकतो”, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

दरम्यान, एकिकडे प्रवाशांच्या सुकर प्रवासासाठी एसटी महामंडळ आपल्या ताफ्यातील बसच्या संख्येत वाढ करत आहे. तर, दुसरीकडे प्रवासी तिकीट दरात भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात एसटीचे प्रवासी दुरावणार का, अशी भीती वर्तवली जात आहे.


हेही वाचा – Waqf Amendment Bill : वक्फ सुधारणा विधेयकावरील विरोधकांच्या शिफारशी फेटाळल्या, JPCची बैठक संपली