Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र क्या बात है! आता लालपरीचं लोकेशनही कळणार एका क्लिकवर!

क्या बात है! आता लालपरीचं लोकेशनही कळणार एका क्लिकवर!

आता प्रवाशांची चिंता मिटणार, कारण तुमची लालपरी कोणत्या ठिकाणी आहे हे लोकेशन असणार तुमच्या हातात...

Related Story

- Advertisement -

एसटीची सेवा “गाव तेथे एसटी”, “रस्ता तेथे एसटी” या ब्रीदवाक्यानुसार खेड्यापासून शहरापर्यंत विस्तारलेली आहे. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली लालपरी अर्थात एसटी बस नेहमीच वेळेवर हजर राहते असे नाही. त्यामुळे एसटी वेळेवर येण्याचे प्रमाण अगदी नगण्य असते. त्यामुळे प्रवाशाला एसटी बस कधी येईल याची वाट बघावी लागते. पण आता प्रवाशांची ही चिंता मिटणार आहे. कारण तुमची लालपरी कोणत्या ठिकाणी आहे हे लोकेशन आता तुमच्या हातात असणार आहे. राज्य परिवहन एसटी महामंडळाने राज्यातील सर्वच बसेसमध्ये व्हीटीएस म्हणजेच व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीम बसवण्यात येणार असून हे काम पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या नव्या प्रणालीमार्फत एसटी बस कोणत्या ठिकाणी पोहोचली किंवा एखादी बस येण्यास किती वेळ लागेल याची माहीती प्रवाशांना आपल्या मोबाईलवर सहज समजू शकणार आहे.

एसटी महामंडळाने स्वतःच्या कार्यशाळेत तयार केलेले हे एमएसआरटी मोबाईल अॅप्लिकेशन असून एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांना या अॅप्लिकेशनचा वापर करता येणार आहे. या अॅप्लिकेशनच्या वापराने प्रवाशांना एसटी कुठपर्यंत पोहोचली आहे. त्याची माहिती समजू शकणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आपल्या प्रवाशांचे हित आणि सोयीकरता व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीम नवं अॅप्लिकेशन तयार केले आहे. रेल्वे विभागाकडून दिलेल्या माहितीप्रमाणे एसटी महामंडळाने देखील प्रवाशांची एसटीची माहिती प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे. हे जीपीएस म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम या यंत्रणेमुळे शक्य होण्यास मदत होणार आहे.

अशी होणार अॅपची मदत

- Advertisement -

या अॅप्लिकेशनच्या मदतीने प्रवाशांना जवळची बसस्थानकं, त्या ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या बसेसची माहिती, बस कोणत्या स्थानकावर पोहोचली आहे. बस कोठे पोहोचली आहे. बसचा वेग किती आहे. बस कोणत्या आगामी स्थानकावर थांबणार आहे. बस कोणत्या मार्गाने जात आहे, याची माहिती देखील प्रवाशांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -