Homeताज्या घडामोडीST fare hike : परिवहन मंत्र्यांची केवळ चमकोगिरीच; एसटी भाडेवाढ रद्द करा...

ST fare hike : परिवहन मंत्र्यांची केवळ चमकोगिरीच; एसटी भाडेवाढ रद्द करा – अंबादास दानवे

Subscribe

संभाजीनगर येथील मध्यवर्ती एसटी स्थानकांवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. एसटीची वाढलेली भाडेवाढ रद्द करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अंबादास दानवे यांनी एसटी महामंडळाच्या निर्णयासह राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

संभाजीनगर : एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत एसटीच्या भाडे वाढीला मंजूरी देण्यात आली आहे. येत्या 25 जानेवारीपासून ही दरवाढ लागू झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. अशात ही भाडेवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही. त्यामुळे हा भाडेवाढ रद्द करण्यात यावी, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोध पक्षनेते अंबादास दानवे यांनी आंदोलन केले. (MSRTC ST BUS Fare Hike Shiv Sena UBT Ambadas Danve Protest at sambhajinagar)

संभाजीनगर येथील मध्यवर्ती एसटी स्थानकांवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. एसटीची वाढलेली भाडेवाढ रद्द करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अंबादास दानवे यांनी एसटी महामंडळाच्या निर्णयासह राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

नेमकं काय म्हणाले अंबादास दानवे?

“एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली 15 टक्के भाडेवाढ ही अन्यायकारक आहे. दोन महिन्यांपूर्वी एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी एसटी नफ्यात असल्याची घोषणा केली होती. याबाबत आकडेवारीही जाहीर केली होती. पण आता एसटीकडून तिकिटांमध्ये 15 टक्के भाडेवाढ करण्यात आली. दुर्दैव म्हणजे एसटी ही भाडेवाढ परिवहन मंत्र्यांनाच माहीत नाही. खातं मिळाल्यानंतर परिवहन मत्र्यांनी केवळ चमकोगिरी केली. कधी बस स्टँडवर गेले तर, कधी एसटीतून प्रवास केला. पण या मंत्र्यांना एसटी प्रवाशांच्या व्यथा समजल्या नाहीत”, असे अंबादास दानवे म्हणाले.

“एसटीची भाडेवाढ हा अन्याय आहे. कारण शहरी भागांत आणि ग्रामीण भागांतील सर्वसामान्यांच्या प्रवासाचे एसटी हे मुख्य साधन आहे. पण हेच सर्वसामान्यांच्या प्रवासाचे साधन महागलं असेल तर, ही भाडेवाढ रद्द झाली पाहिजे. ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका आहे. आज संपूर्ण मराठवाड्यातील बस स्टँडवर आमचं आंदोलन होत आहे. आज आम्ही केवळ रस्त्यावर बसलो आहोत. पण येणाऱ्या काळात आम्ही मुख्य रस्त्यावर बसू. चक्का जाम करू आणि या सरकारला भाडेवाढ रद्द करायला भाग पाडू”, असेही अंबादास दानवे म्हणाले.

“आज मराठवाड्यात एसटीच्या भाडेवाढीविरोधात आंदोलन होत आहे. मात्र, उद्या (28 जानेवारी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभरात एसटीच्या भाडेवाढीविरोधात आंदोलन होणार असल्याचे, उद्धव ठाकरेंकडून जाहीर करण्यात आले आहे. भाडेवाढी ही कधीच 15 टक्के होत नाही. 2 ते 3 टक्के होते. एसटीचे अध्यक्ष सांगतात की एसटी नफ्यात आहे. पण हे सरकार इतर ठिकाणी पैसे वाटते, प्रलोबन दाखवतात. मग एसटीने काय केलं आहे. एसटीतून सर्वसामान्य माणूस प्रवास करतो. एसटीतून उद्योजक प्रवास करत नाहीत. एसटीची बी भाडेवाड सर्वसामान्यांना सोसणारी नाही. त्यामुळे ही भाडेवाढ रद्द केली पाहिजे. नाहीतर हा सर्वसामान्यांवर अन्याय झाला, असे मान्य करावं लागेल. सरकारचे कान, नाक, डोळे आणि तोबाड बंद असतील तर जनतेच्या भावना म्हणून आणि विरोधक म्हणून आम्ही आंदोलन करू”, असेही अंबादास दानवे यावेळी म्हणाले.


हेही वाचा – Chhaava Controversy : अखेर ठरले, छावा चित्रपटातील ती दृष्ये डिलीट होणार; ठाकरेंना भेटताच दिग्दर्शकाचा निर्णय