घरताज्या घडामोडीएसटीची भाडेवाढ पुन्हा पूर्वपदावर; प्रवाशांना दिलासा

एसटीची भाडेवाढ पुन्हा पूर्वपदावर; प्रवाशांना दिलासा

Subscribe

यंदा दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाकडून तिकीट दरात 10 टक्के भाडेवाढ करण्यात आली होती. ऐन सणासुदीच्यावेळी तिकीट दर वाढवल्याने सर्वसामान्य प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसला. मात्र दिवाळीनंतर पुन्हा एकदा एसटीची भाडेवाढ पूर्वपदावर आली आहे.

यंदा दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाकडून तिकीट दरात 10 टक्के भाडेवाढ करण्यात आली होती. ऐन सणासुदीच्यावेळी तिकीट दर वाढवल्याने सर्वसामान्य प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसला. मात्र दिवाळीनंतर पुन्हा एकदा एसटीची भाडेवाढ पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता भाडेवाढीपूर्वीच्या तिकीट दरात प्रवास करता येणार आहे.

एसीटी भाडेवाढ पूर्वपदावर आल्यानंतर आता पुण्याला जाण्यासाठी 195च्या ऐवजी 175 रुपये भाडे लागणार आहे. तर मुंबईचे भाडे देखील 450 रुपयावरून कमी होत 410 आकारले जाणार आहे. ( MSRTC St fare Passengers)

- Advertisement -

राज्य सरकारने दिवाळीनिमित्त तात्पुरती भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. ही भाडेवाढ 20 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत करण्यात आली होती. प्रवाशांची या कालावधीत गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने जादा बस गाड्यांचे नियोजन केले होते.

दिवाळीपूर्वी साध्या व जलद गाडीसाठी प्रति टप्पा भाडे 8 रुपये 70 पैसे होते. तात्पुरत्या दरवाढीमध्ये प्रति टप्पा भाडे 9 रुपये 70 पैसे प्रति टप्पा करण्यात आले. त्यामुळे अहमदनगर येथून पुणे येथे जाण्यासाठी साध्या गाडीला 195 रुपये प्रवास भाडे तर मुंबईसाठी 450, कल्याण 350 तसेच औरंगाबाद 1851 रुपये भाडे आकारणी करण्यात आली.

- Advertisement -

दरम्यान, ही भाडेवाढ 20 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत असल्याने 1 नोव्हेंबरपासून भाडे पूर्वपदावर आले आहे. त्यानुसार आता अहमदनगरहून पुण्याला जाण्यासाठी 175 रुपये तर मुंबईला जाण्यासाठी 410 रुपये भाडे आकारणी केली जाणार आहे.

साध्या बसचे भाडे

  • पंढरपूर 290
  • सोलापूर 340
  • नाशिक 255
  • धुळे 330
  • पुणे 175
  • मुंबई 410
  • औरंगाबाद 175
  • कोल्हापूर 515
  • संगमनेर 150
  • दादर 400
  • शिर्डी 130

निमआराम प्रवासभाडे

  • पंढरपूर 390
  • सोलापूर 465
  • नाशिक 345
  • धुळे 450
  • पुणे 240
  • मुंबई 560
  • औरंगाबाद 240
  • कोल्हापूर 700
  • संगमनेर 200
  • दादर 545
  • शिर्डी 180

हेही वाचा – ठाकरेंचं ‘मिशन 40’, शिंदे गटाच्या आमदारांविरोधात उद्धव ठाकरेंकडून उमेदवारांची चाचपणी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -