घरताज्या घडामोडीहोळीनिमित्त एसटी महामंडळ कोकणात सोडणार 250 जादा बसेस

होळीनिमित्त एसटी महामंडळ कोकणात सोडणार 250 जादा बसेस

Subscribe

होळी आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. होळीसाठी अनेक जण कोकणाची वाट धरतात. कोकणातील होळीनिमित्त साजरा होणारा शिमगा प्रसिद्ध आहे. या शिमग्यासाठी राज्यभरातील अनेक चाकरमानी कोकणात जातात.

मुंबई : होळी आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. होळीसाठी अनेक जण कोकणाची वाट धरतात. कोकणातील होळीनिमित्त साजरा होणारा शिमगा प्रसिद्ध आहे. या शिमग्यासाठी राज्यभरातील अनेक चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळातर्फे कोकणासाठी 250 जादा बसेल सोडण्यात येणार आहे. (MSRTC will release 250 extra buses in Konkan on the occasion of Holi)

पुढील महिन्यात म्हणजेच 6 मार्च रोजी होळी आहे तर, 7 मार्च रोजी धुलिवंदन आहे. त्यामुळे होळीच्या दोन दिवस अगोदरच चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी 3 मार्च ते 12 मार्च 2023 दरम्यान या गाड्या कोकणातील मार्गावरून धावणार आहेत. याबाबत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी माहिती दिली. शिवाय, सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या बसेसमधून प्रवास करावा, असे आवाहनही महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

- Advertisement -

गणेशोत्सवाबरोबरच होळीचा सणही कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जात असतात. त्यामुळे या सणाच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी सज्ज झाली असून महामंडळाने यंदा 250 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा तसेच पनवेल येथील बसस्थानकांतून खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मालवण आदी भागात या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

- Advertisement -

आगाऊ आरक्षणासाठी एसटी महामंडळाच्या https://msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच Msrtc Mobile Reservation App याचाही प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.


हेही वाचा – नेपाळच्या नोटा छपाईचे कंत्राट मिळवण्यात भारताला यश; ‘या’ देशांना टाकले मागे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -