घरताज्या घडामोडीभाजपकडून मुख्यमंत्री परिषद आयोजित, महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस उपस्थित; मोदी करणार मार्गदर्शन

भाजपकडून मुख्यमंत्री परिषद आयोजित, महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस उपस्थित; मोदी करणार मार्गदर्शन

Subscribe

भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांसाठी मुख्यमंत्री परिषद दिल्लीतील भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डांसह पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित आहे. यावेळी ते मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसंच, या परिषदेत अनेक उपमुख्यमंत्रीही उपस्थित आहेत. या परिषदेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, हिमंता बिस्वा सरमा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, युपीचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहभागी आहेत. (Mukhyamantri Parishad by bjp, Narendra modi will guide to cm)


आप-आपल्या राज्यात राबवलेल्या कल्यणाकारी योजनांविषयी या परिषदेत अहवाल सादर करण्याच्या सूचना या परिषदेत देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय. आगामी विधानसभा निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. तसंच, विविध योजनांविषयी नरेंद्र मोदी या परिषदेत चर्चा करणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – पक्षाची काय अवस्था करून टाकलीय, संजय राऊतांना आता तरी समज आली पाहिजे; फडणवीसांचा टोला

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -