उमेदवारी न दिल्यामुळे मुक्ता टिळकांचे पती नाराज, भाजपला धक्का बसण्याची शक्यता

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या २७ फ्रेब्रुवारीला दोन्ही मतदारसंघात निवडणूक होणार पार पडणार आहे. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे. त्यासाठी भाजपने पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर मुक्ता टिळक यांचे पती शैलेस टिळक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील टिळकवाड्यात जाऊन शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता उमेदवारी न मिळाल्यामुळं अन्याय झाल्याचं सांगतानाच शैलेश टिळक यांना अश्रू अनावर झाले आहेत.

मुक्ता टिळकांच्या निधनानंतर कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी मिळेल, अशी आशा असल्यानं आम्ही भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. परंतु आम्हाला तिकीट देण्यात आलेलं नाही. त्याचं कारण काय आहे, हे आम्हाला माहिती नाही. मुक्ता टिळक यांच्या आजारपणातील कामावर अन्याय झाल्याचं सांगताच शैलेश टिळकांचा कंठ दाटून आला.

गेल्या २० वर्षांपासून मुक्ता टिळक या मतदारसंघात काम करत होत्या. त्यांनी अनेक पदांवर काम केलं. त्यांच्या निधनानंतर कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळेल, अशी आशा आम्हाला होती. परंतु ते होऊ शकलेलं नाही. परंतु आता पक्षानं घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असून आम्ही भाजपचं काम करणार असल्याचं शैलेश टिळक म्हणाले.


हेही वाचा : डॅमेज कंट्रोलसाठी थेट आदित्य ठाकरेंना केले नाशकात पाचारण; देवळालीत सभेचे