Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पुणे भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन, पुण्यात घेतला अखेरचा श्वास

भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन, पुण्यात घेतला अखेरचा श्वास

Subscribe

पुणे – भाजपाच्या आमदार आणि पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं आज दिर्घ आजाराने निधन झाले आहे. पुण्यातील गॅलक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर ३ वाजून ३० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

मुक्ता टिळक या गेल्या अनेक महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील त्या विद्यमान आमदार होत्या. तसंच, पुण्यातील भाजपा नेत्यांच्या यादीत त्यांचं मानाचं स्थान होतं. तर, २०१७ ते २०१९ या काळात त्यांनी पुण्याच महापौर पदही भुषवलं होतं.

- Advertisement -

पुण्यातील भावे स्कूलमधून शालेय शिक्षण झाले होते.महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. मुक्ता टिळक यांनी पत्रकारितेचं शिक्षण घेतलं होतं. त्या बरीच वर्षे पुणे महापालिकेत नगरसेविका होत्या. सदाशिव नारायण पेठेतील प्रभाग क्रमांक १५ च्या नगरसेविका होत्या. नगरसेवकानंतर त्या महापालिकेत गटनेत्या होत्या. त्यानंतर त्या महापौर होत्या. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमदारकीसाठी जोर लावला. त्यात त्या यशस्वी ठरल्या.

जूनमध्ये पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत त्या आजारी असतानाही पुण्यातून मुंबईत आल्या होत्या. रुग्णवाहिकेतून येत त्यांनी मतदान केले होते. त्यानंतर त्या गेले काही दिवस आजारी होत्या. अखेर आज त्यांची कर्करोगाशी झुंज संपली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -