घरताज्या घडामोडीसीएसएमटी स्थानकाचे रुपडं पालटणार, १८०० कोटींचा खर्च निश्चित

सीएसएमटी स्थानकाचे रुपडं पालटणार, १८०० कोटींचा खर्च निश्चित

Subscribe

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाचा पुर्नविकास होणार आहे. सीएसएमटीचा पुनर्विकास अगोदर खासगी आणि सार्वजनिक सहभागातूनच होणार होता.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाचा पुर्नविकास होणार आहे. सीएसएमटीचा पुनर्विकास अगोदर खासगी आणि सार्वजनिक सहभागातूनच होणार होता. मात्र, आता त्यामध्ये मुख्य काही बदल करण्यात आले आहेत. (Mumbai 1800 crore redevelopment CSMT Mumbai Local Train)

अगोदर ६० टक्के खासगी (Private) सहभाग आणि ४० टक्के रेल्वेचा सहभाग होता. सीएसएमटी स्थानकाच्या पुर्नविकासासाठी तब्बल १८०० कोटींचे खर्च निश्चित करण्यात आला आहे. निधी मिळावा यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीत रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाने प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे.

- Advertisement -

गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास केला आहे. या पुनर्विकासावेळी सीएसएमटीच्या सुविधांमध्ये मोठी वाढ करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पुनर्विकासानंतर स्थानकामध्ये खाण्यापिण्याची दुकाने आणि मनोरंजनाच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.

सीएसएमटी स्थानकात ऊर्जा बचत करणाऱ्या यंत्रणेचा वापर जास्त केला जाणार आहे. दिव्यांगांना विविध सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानुसार, पुनर्विकासानंतर सर्वसामान्य प्रवाश्यांसोबतच दिव्यांगांचाही प्रवास सुखकर होणार आहे. पुनर्विकास सार्वजनिक खासगी भागीदारीवर होणार होता.

- Advertisement -

यासाठी एकाच कंपनीची निवड केली जाणार होती. मात्र, ते सर्व रद्द करण्यात आले आणि यासाठी हायब्रिड बिल्ड ऑपरेट पद्धत अवलंबवली जाणार होती. यामध्ये खासगीची ६० टक्के आणि रेल्वेची ४० टक्के भागीदारी तसेच आता केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची देखील माहिती आहे.


हेही वाचा – रेल्वेच्या यात्री ॲपद्वारे प्रवाशांना समजणार लोकलचे थेट लोकेशन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -