घरमहाराष्ट्रअमृता फडणवीसांच्या 'त्या' विधानावर आदित्य ठाकरे म्हणतात, कॉमेडीसाठी आपण त्यांना टीव्हीवर ठेवू.

अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावर आदित्य ठाकरे म्हणतात, कॉमेडीसाठी आपण त्यांना टीव्हीवर ठेवू.

Subscribe

महाराष्ट्राचा नाव देशभरात नाही तर जगभरात झाल आहे ते मॉडेल आम्ही देशभर नेऊ,'' असही मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यावरून आरोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळतेय. यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडूनही ठाकरे सरकारवर सतत टीका केली जात आहे. अशातच अमृता फडणवीस यांचे एक वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुंबईच्या वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट होत असल्याचे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. मात्र या वक्तव्यावर आता उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहे. अमृता फडणवीसांच्या या वक्तव्यावर आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही टीका केली आहे. ‘कॉमेडीसाठी आपण त्यांना टीव्हीवर ठेऊ’ असं मंत्री आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

मुंबईचे पालकमंत्री आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे सध्या मुंबईत विविध विभागांचा दौरा करत आहे. या दौऱ्यावेळी बोलताना मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, कॉमेडीसाठी आपण त्यांना टीव्हीवर ठेऊ .. आपण राजकीय मंडळी म्हणून काम करतो समाजकारण असते ते आपण जनतेपुढे घेऊन जाऊ. असं म्हणत समाजकारणातील महत्वाचे राजकीय मुद्दे कॉमेडीसाठी नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

“योग्यवेळी योग्य ठिकाणी बास्केटमध्ये बॉल कसा टाकायचा हे शिवसैनिकांना माहिती आहे. निवडणुकीला अद्याप वेळ आहे चांगली काम होत असतात. ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहोत निवडणुकीच्या वेळेला प्रचारात त्यांना उत्तर देऊ” असंही मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

“मुंबई आणि महाराष्ट्र मॉडेल आम्हाला इतर राज्यात घेऊन जायचंय”

“एवढी वर्ष जे आमचे मित्रपक्ष होते त्यांना धक्का न लागो म्हणून आम्ही लढलो नव्हतो. पण आता लढत असताना आम्ही सगळीकडे प्रचाराला जाणार आहेत, मुंबईचं मॉडेल काय, महाराष्ट्राचं मॉडेल काय…. गेली दोन्ही वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टॉप फाईव्ह मधले मुख्यमंत्री आहेत. देशभरात मुख्यमंत्र्यांची स्पर्धा असते हा नंबर मिळविण्यात कठीण काम असतं. हा महाराष्ट्राचा गव्हर्नर मॉडेल आम्ही मांडणार आहोत. महाराष्ट्राचा नाव देशभरात नाही तर जगभरात झाल आहे ते मॉडेल आम्ही देशभर नेऊ,” असही मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.


Lata Mangeshkar Health Update: लता मंगेशकरांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली, व्हेंटिलेटरवर हलवले


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -