घरताज्या घडामोडीमुंबई-आग्रा महामार्गावर एसटी बसचा अपघात, दोन प्रवासी जखमी

मुंबई-आग्रा महामार्गावर एसटी बसचा अपघात, दोन प्रवासी जखमी

Subscribe

मुंबई-आग्रा महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. धुळ्याहून शिरपूरकडे जाणाऱ्या धुळे-शिरपूर बसचा भीषण अपघात झाला. यावेळी ओव्हरटेकच्या नादामध्ये कंटेनरला बसने पाठीमागून धडक दिली. या अपघातात बस चालकासह दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर नरडाणा गाव परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या अपघाताची माहिती संबंधित पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारीदेखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

इतर प्रवाशांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नसली तरीही या अपघातात बसचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातानंतर मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

महामार्गावर गेल्या महिन्याभरापासून अपघातांची मालिका सुरूच आहे. या अपघातांची मालिका थांबवण्यासाठी महामार्ग पोलीस आणि संबंधित टोल प्रशासनाने दखल घ्यावी आणि सूचनाफलक लावण्याची आवश्यकता असल्याचे देखील नागरिकांकडून सांगितले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा : लोकशाहीतील पाच घटना आणि दबावाचे एक सूत्र!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -