Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी मुंबई विमानतळावर 9.5 किलोचे सोने जप्त, सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई

मुंबई विमानतळावर 9.5 किलोचे सोने जप्त, सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई

Subscribe

मुंबई विमानतळावर 9.5 किलोचे सोने जप्त करण्यात आले असून सीमाशुल्क विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाने वेगवेगळ्या आठ प्रकरणांमध्ये सुमारे 9.5 किलोचे सोने जप्त केले आहे. ज्याची बाजारातील किंमत 4.75 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

तस्करीचे 2.99 कोटी रुपयांचे 6000 ग्रॅम सोने घेऊन दुबईहून आलेल्या दोन अझरबैजान नागरिकांना अटक करण्यात आली असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाने दिली आहे.

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वीही सोन्याची तस्करी करणाऱ्यांवर सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई केली होती. मेणात लपवून आठ किलो सोने आणणाऱ्या व्यक्तीला मुंबई विमानतळावर पकडून सोने जप्त करण्यात आले होते. 4.14 कोटी रुपयांचे सोने दुबईतून आणणाऱ्या आखाती नागरिकाला सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी अटक केली होती.

- Advertisement -

मेणाचे गोळे करत त्यात लपवून आणलेले 8 किलो सोने सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी पकडले. याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 4 कोटी 14 लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी तब्बल 11 परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. शारजा येथून मुंबईत आलेले हे प्रवासी सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. या नागरिकांनी मेणाच्या लहान गोळ्या करुन त्यात हे सोने लपवले होते.


हेही वाचा : व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येतेय, समाज किती पेटून उठतोय याचं टेस्टिंग सुरू..; जयंत पाटलांचा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -