प्रवाशांनो लक्ष द्या! मुंबई विमानतळ आज सहा तास राहणार बंद

विमान कंपन्यांनी प्रवाशांची सोय लक्षात घेऊन फ्लाइटचे वेळापत्रक बदलले आहे. मुंबई विमानतळ हे आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानता यामुळे एकूण आठ उड्डाणे विमानतळावर वळवण्यात आली होती.

mumbai airport
मुंबई विमानतळाचा ताबा अदानीकडे

मुंबई – मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तुम्ही आज प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई विमानतळावरील दोन रनवेवरून आज सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विमान वाहतूक होणार नाही. सहा तास मुंबई विमानतळ बंद राहणार आहे. दुरुस्ती आणि देखभालीसाठी रनवे बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे विमान वाहतुकीला उशीर होणार आहे. काही विमान उड्डाणाच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – …म्हणून बिल्किस बानो प्रकरणातील दोषींची मुक्तता, गुजरात सरकारचा सुप्रीम कोर्टासमोर खुलासा

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रशासनाकडून (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) सोमवारी अधिकृत सूचना जारी झाली आहे. त्यानुसार, मंगळवारी, १८ ऑक्टोबर रोजी १४/३२ आणि ९/२७ हे दोन रनवे सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंद राहणार आहे. पाऊस गेल्यानंतर दुरुस्ती आणि देखभाल केली जाते. रनवे १४/३२ वर रनवे एज लाईट्स आणि एजीएल (एरोनॉटिकल ग्राऊंड लाईट्स)च्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. तर, इतरही अनेक दुरुस्तीची कामे आज होणार आहेत.

हेही वाचा – शरद पवार, उद्धव ठाकरेंनी स्वीकारले काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे निमंत्रण

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर मुंबई विमानतळ हे दुसरे सर्वात मोठे एअरोडोम आहे. सीएसएमआयएच्या सल्लागाराने सांगितले की, मुंबई विमानतळावरून दररोज 800 हून अधिक उड्डाणे उड्डाण करतात आणि उतरतात. प्रवाशांच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य आहे. काळजीपूर्वक लँडिंग आणि विमानांच्या उड्डाणासाठी धावपट्टीची दुरुस्ती आणि देखभाल करणे खूप महत्वाचे आहे. आता पावसाळा संपला आहे. अशा स्थितीत मंगळवारी धावपट्टीच्या दुरुस्ती व देखभालीचे काम करण्यात येणार आहे. यादरम्यान दोन्ही धावपट्टी सहा तास बंद राहणार आहेत.

उड्डाणाचे वेळापत्रक बदलले

विमान कंपन्यांनी प्रवाशांची सोय लक्षात घेऊन फ्लाइटचे वेळापत्रक बदलले आहे. मुंबई विमानतळ हे आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानता यामुळे एकूण आठ उड्डाणे विमानतळावर वळवण्यात आली होती.