घरताज्या घडामोडीBalasaheb Thackeray Birth Anniversary: ५० हजार दिव्यांनी उभारले बाळासाहेबांचे भव्य पोट्रेट, मराठमोळ्या...

Balasaheb Thackeray Birth Anniversary: ५० हजार दिव्यांनी उभारले बाळासाहेबांचे भव्य पोट्रेट, मराठमोळ्या कलाकाराचे अभिवादन

Subscribe

शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज ९६वी जयंती आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त मराठमोळ्या कलाकारांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुंबईत राहणाऱ्या चेतन राऊत या कलाकाराने ४० फूट लांब आणि ३० फूट रुंदीचं पोट्रेट तयार केलंय. शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पवई येथील महापालिका शाळेच्या शेजारी चेतन राऊत आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून बाळासाहेब ठाकरेंचं पोट्रेट साकारलं आहे.

५० हजार मातीच्या दिव्यांचा वापर 

चेतन राऊतने ५० हजार मातीच्या दिव्यांचा वापर करत ही कलाकृती साकारली आहे. यामध्ये सहा रंगछटा असलेले दिवे वापरण्यात आले आहेत. तसेच ही कलाकृती साकारण्यासाठी तब्बल ९ तासांचा अवधी लागला आहे. पवईच्या हरिश्चंद्र मैदानात साकारण्यात आलेले हे पोट्रेट पाहण्यासाठी नागरिकांनी आजपासून भेट देण्यास सुरूवात केली आहे.

- Advertisement -

मागील दोन वर्षांपासून कोरोना विषाणूच्या संकटामुळे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी केली जात आहे. यानिमित्ताने आज सकाळपासून मुंबईतील दादर शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर अनेक शिवसैनिक, कार्यकर्ते, मान्यवर दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी ट्वीटद्वारे बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं आहे.


हेही वाचा : Go First Airlines ची प्रजासत्ताक दिनानिमित्त भन्नाट ऑफर ! फक्त ९२६ रूपयात देशात कुठेही करा प्रवास

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -