घरमहाराष्ट्रMumbai Bank : मुंबै बँक बोगस कर्ज वाटपप्रकरणी प्रवीण दरेकर, धस...

Mumbai Bank : मुंबै बँक बोगस कर्ज वाटपप्रकरणी प्रवीण दरेकर, धस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Subscribe

मुंबै बँकेचे माजी अध्यक्ष प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण मुंबै बँकेच्या माध्यमातून बोगस कर्ज वाटप केल्याप्रकरणी प्रवीण दरेकर आणि धस पती पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्याच्या सहकार खात्याने दिले आहेत. मुंबै बँकेच्या माध्यमातून बोगस कागदपत्रांच्या आधारे 27 कोटींचे कर्ज वाटप केल्याचे आरोप त्यांच्याविरोधात करण्यात आले आहेत. यामुळे दरेकर यांच्यासह सुरेश धस आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्याविरोधात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य सहकार खात्याने दिले आहेत.

धस यांच्या मालकीच्या जयदत्त ऍग्रो इंडस्ट्रीज, अंभोरा आणि मच्छिंद्रनाथ ओव्हरसीज प्रा. लि. आष्टी या कागदोपत्री उद्योगांना हे कर्ज वाटप करण्यात आले होते. यासाठी बनावट कागदपत्र तयार करण्यात आली, त्यामुळे सहकार खात्याने  मुंबै बँकेने या कर्ज वाटपात मोठी अनियमितता केल्याचे म्हणत हे आर्थिक व्यवहार संशयास्पद आणि गैरवापर करण्याच्या उद्देशाने केल्याचे दिसून आले. तसेच यातून हितसंबंधित लोकांनाच कर्ज वाटप केल्याचा आरोप करण्यात आले.

- Advertisement -

त्यामुळे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात मुंबै बँकेने बीड जिल्ह्यात बनावट कागदपत्र्यांच्या आधारे 27 कोटी रुपयांचे कर्ज बेकायदेशीरपणे वाटप केल्याने कर्ज घेणारा आणि कर्ज घेणाऱ्या अशा दोघांविरोधात आर्थिक फसवणूक आणि व्यवहारातील अनियमिततेअंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश सहकार खात्याने दिले आहेत. या कर्ज वाटपादरम्यान प्रवीण दरेकर मुंबै बँकेच्या अध्यक्ष पदावर होते. मात्र प्रवीण दरेकरांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.


Coronavirus Cases Today : देशातील कोरोना मृतांच्या संख्येत मोठी घट, आज 4362 नवे रुग्ण, 66 रुग्णांचा मृत्यू

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -