आशिष शेलारांना पत्रातून जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडून तपास सुरू

Mumbai BJP President Ashish Shelar Receives Death Threat complaint filed in bandra police station

भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांनी जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. एका निनावी पत्राद्वारे आशिष शेलार यांनी धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी वांद्रो पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. आशिष शेलार आणि त्यांच्या कुटुंबियांना मारून समुद्रात फेकू अशाप्रकारची धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. या पत्रातून आशिष शेलार यांच्यासह भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधात अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरण्यात आली आहे.

या पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?

आशिष शेलार यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनाही या पत्रातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तुम्ही अशीच आक्रमक भूमिका घेत राहिलात तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना जीवे ठार मारून समुद्रात फेकून अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. या याप्रकरणी शेलारांच्या कार्यालयाच्यावतीने वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पत्रामागचा नेमका सुत्रधार कोण? आणि कोणत्या पोस्ट ऑफिसमधून हे पत्र आलं आहे? याचा तपास आता वांद्रे पोलीस करत आहेत.


ते माझ्या पक्षाचे नेते नाहीत; राऊतांचा आंबेडकरांवर पलटवार