Homeमहाराष्ट्रMumbai BMC : मुंबईतील रस्ते, स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याची चौकशी करा; आदित्य ठाकरेंची...

Mumbai BMC : मुंबईतील रस्ते, स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याची चौकशी करा; आदित्य ठाकरेंची मागणी

Subscribe

मुंबई : भाजप – शिवसेना (शिंदे गट) महायुती सरकारच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेत तब्बल 6 हजार कोटी रुपयांच्या रस्ते कामात आणि 263 कोटी रुपयांच्या स्ट्रीट फर्निचर कामात झालेला घोटाळा आम्ही उघड केला. पण याप्रकरणी अद्यापही कुठली चौकशी किंवा कारवाई झालेली नाही. त्यामुळे याप्रकरणी सखोल चौकशी करावी आणि महापालिकेची लूट करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी माजी मंत्री आणि शिवसेनेचे (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे. (Mumbai BMC Aaditya Thackeray inquiry into Mumbai’s road and street furniture scam)

हेही वाचा : Uddhav Thackeray : ज्यांना पक्ष सोडायचा असेल त्यांनी खुशाल सोडावा! ठाकरेंची भूमिका 

- Advertisement -

मुंबईतील महापालिकेतील रस्ते, स्ट्रीट फर्निचर कामातील घोटाळा, पाणी समस्या व इतर विषयांबाबत आमदार आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबई महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त गगराणी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे मागणी केली. राज्यात भाजप-महायुतीचे सरकार असताना महापालिकेच्या 6 हजार कोटी रुपयांच्या रस्ते कामात घोटाळा करण्यात आला. हा घोटाळा आम्ही उघड केला. त्यामुळे रस्ते कामासाठी होणार्‍या खर्चात तब्बल 900 कोटी रुपयांनी घट करण्यात आली. त्यामुळे रस्ते कामात घोटाळा झाला होता हे उघडकीस आले आहे.

तसेच, 263 कोटी रुपयांच्या स्ट्रीट फर्निचर कामातही घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. सदर कामाचे टेंडर नंतर रद्द करण्यात आले. मात्र याप्रकरणी महापालिकेने काय चौकशी व कारवाई केली याबाबत काहीच माहिती पालिकेकडून देण्यात येत नाही. त्यामुळे याप्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -