घरमहाराष्ट्रईडीच्या समन्सवर आयुक्त चहल यांनी सोडलं मौन; म्हणाले, 'चौकशीला पूर्ण सहकार्य करणार'

ईडीच्या समन्सवर आयुक्त चहल यांनी सोडलं मौन; म्हणाले, ‘चौकशीला पूर्ण सहकार्य करणार’

Subscribe

मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इकबाल सिंह यांना अंमलबजावणी संचालयाने (ED) मुंबईतील कोव्हिड सेंटरमधील कथित घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आयुक्त चहल यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान ईडीच्या समन्सवर आयुक्त चहल यांनी मौन सोडलं आहे. ईडीच्या चौकशीत मी पूर्ण सहकार्य करणार अशी प्रतिक्रिया आयुक्त चहल यांनी दिली आहे.

कोरोना काळात मुंबईतील कोविड सेंटरमध्ये ठाकरे सरकारने वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. बेनामी कंपन्यांना कोविड सेंटरचे कंत्राट देऊन आयुक्त चहल यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे. सोमय्या यांनी याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या प्रकरणाची चौकशी आता ईडीच्या मार्फत सुरु असून त्यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या कोव्हिड काळातील कामांना वगळून इतर कामांची चौकशी करण्याचे आदेश नुकतेच राज्य सरकारने कॅगला दिले होते. रस्ते आणि इतर कामांच्या चौकशीचे आदेश देखील राज्य सरकारने दिले होते. यानंतर काही दिवसातचं ईडीने समन्स बजावला आहे. यासंदर्भात चहल यांनी 16 जानेवारीला चौकशीसाठी ईडीने हजर राहण्याचे आदेश दिले आहे.


पंकजा मुंडे भाजपवर नाराज; फडणवीसांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला दर्शवली गैरहजेरी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -