घरताज्या घडामोडीमुंबई महापालिका निवडणूक सप्टेंबरअखेर अथवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात

मुंबई महापालिका निवडणूक सप्टेंबरअखेर अथवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात

Subscribe

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी २२७ वार्ड ऐवजी त्यात आणखीन ९ वार्ड संख्या वाढविण्याबाबत मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार वार्डाची (Ward) संख्या २३६ एवढी करण्यावर राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commissioner) शिक्कामोर्तब केले.

केंद्र सरकारसह (Central Government) राज्यातील भाजप नेत्यांचे डोळे लागलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक (BMC Election) ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC reservation) येत्या सप्टेंबर अखेर अथवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता पालिका सूत्रांनी वर्तवली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) काही दिवसांपूर्वीच मुंबईसह राज्यातील इतर महापालिकांची मुदत संपल्याने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे व त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानुसार, निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी २२७ वार्ड ऐवजी त्यात आणखीन ९ वार्ड संख्या वाढविण्याबाबत मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार वार्डाची (Ward) संख्या २३६ एवढी करण्यावर राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commissioner) शिक्कामोर्तब केले. आता त्यापुढे जाऊन ३१ मे रोजी ओबीसी आरक्षणाशिवाय वांद्रे येथील रंगशारदामध्ये प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

- Advertisement -

१ ते ६ जून या कालावधीत हरकती सूचना मागविण्यात येणार असून त्याबाबत योग्य तो निर्णय घेऊन १३ जून रोजी आरक्षण सोडत अंतिम करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे समजते. त्यानंतर निवडणुकीचा पुढील टप्पा म्हणून मतदार याद्या अंतिम करण्यासाठी प्रक्रिया सुरू होणार आहे.

हेही वाचा – मुंबईसह १४ महापालिकांची आरक्षण सोडत ३१ मे रोजी, निवडणूक आयोगाचे आणखी एक पाऊल

- Advertisement -

त्यानंतर बूथनिहाय बनविण्यात येणाऱ्या मतदार याद्यांवर हरकती व सूचना मागवून त्याबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत किमान दीड महिन्यांचा कालावधी जाणार असल्याचे समजते. मतदार याद्या अंतिम झाल्यावर मतदान प्रक्रिया राबविणे आणि त्यापुढील टप्पा म्हणून निवडणूक निकाल बिन चूक जाहीर करणे आदी प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी किमान दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी जाणार आहे.

त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक ही सप्टेंबर अखेरीस अथवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जातील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. थोडक्यात म्हटले तर कोण दिवाळीला फटाके वाजवून आनंद साजरा करणार आणि कोणाची मेहनत दिवाळखोरीत निघणार हे आता निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.


हेही वाचा – मंकीपॉक्सविषयी आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे महत्वपूर्ण वक्तव्य, म्हणाले…

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -