मुंबई : मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ झालेल्या प्रवासी बोटीच्या अपघाताची घटनेला काही दिवस उलटून गेले असता पुन्हा एकदा मुंबईतील समुद्रात एक बोट दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. या मालाडच्या मढजवळ मच्छिमारांची बोट ही मालवाहू जहाजाला धडकल्याचे समोर आले. शनिवारी (28 डिसेंबर) रात्री उशिरा हा अपघात झाला असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Mumbai Boat accident malad madh fishing boat capsized hit by a cargo)
हेही वाचा : Shivaji Maharaj Statue : अभिमानास्पद ! चीनच्या सीमेवजळ उभारला छत्रपती शिवरायांचा पुतळा
समोर आलेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिमेतील मढ कोळीवाडा परिसरातील ग्रामस्थ हेमदीप हरिश्चंद्र टिपरी हे नेहमीप्रमाणे मासेमारी करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी खोल समुद्रात गेले असता या मासेमारी नौकेला चिनी मालवाहू जहाजाने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, त्यांची नौका समुद्रात बुडाली. यामधील तांडेल, खलाशी यांना बाजूला असलेल्या सवटी ग्रुपच्या नौकांनी सुखरुप बाहेर काढले. तसेच, याच ग्रुपच्या 8 बोटींनी नौका बांधून आणली. हे जहाज बंदरावर आणण्यासाठी कोस्ट गार्डचे जहाज सोबत होते. तसेच, दोन अधिकारी शनिवारी रात्रीपासून दोन अधिकारी नौकांवर मदत करत होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ बुधवारी (18 डिसेंबर) दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास एलिफंटाच्या दिशेने जाणाऱ्या नीलकमल या प्रवासी बोटीला भारतीय नौदलाच्या वेगवान स्पीड बोटने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की प्रवासी बोटीला एक मोठे भगदाड पडले आणि ती बोट पाण्यात बुडाली. यावेळी बोटीमध्ये तब्बल 100 हून अधिक प्रवासी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला होता.