घरताज्या घडामोडीALERT...मुंबई पुढील ३ तास मुसळधार पावसाचे

ALERT…मुंबई पुढील ३ तास मुसळधार पावसाचे

Subscribe

मुंबई शहरात येत्या ३ तासांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह ठाणे आणि साताऱ्यासाठी हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

मुंबईत अनेक भागात पावसाळी वातावरण दिसत असल्याच्या वृत्ताला हवामान विभागाकडून दुजोरा देण्यात आला होता. शहराच्या अनेक भागात रडार आणि सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. सकाळच्या सुरूवातीच्या सहा तासांमध्ये मुंबईत ४० मिमी पावसाची नोंद ही २ वाजेपर्यंत झाली होती अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. मुंबईसाठी हवामान विभागाने सोमवारीच एलर्ट दिला होता. त्यानुसार २४ तासांमध्ये शहराच्या काही भागात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता.

- Advertisement -

आज सकाळपासून मुंबईत पावसाचे वातावरण नव्हते. पण दुपारी १ वाजल्यानंतर अनेक भागात ढगांची गर्दी पहायला मिळाली. दुपारी २ वाजल्यापासून मुंबईत पावसाचे जोर धरला आहे. त्यामुळे शहर तसचे उपनगरातही काही ठिकाणी पावसाची चांगली हजेरी लागली आहे. मुंबईसह ठाण्यातही पावसाने जोर धरल्याची माहिती आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या एनवेळी झालेल्या आगमनामुळे लोकांची तारांबळ झाल्याचे पहायला मिळाले. तर काही ठिकाणी एनवेळी आलेल्या पावसाने लोकांना वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागला.

गेल्या आठवड्यात शुक्रवारपासून सलग तीन दिवस मुसळधार पावसाने मुंबईत मुक्काम केला होता. पण सोमवारी थोडी विश्रांती घेतली होती. पण आज पुन्हा एकदा पावसाने आपला जोर शहरात वाढवल्याचे चित्र पहायला मिळाले. मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये सांताक्रुझ वेधशाळा येथे ३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर कुलाबा येथे १३.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -