Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रElection 2024 : मुंबई शहरात सरासरी 52.69 टक्के मतदान; 25 पैकी 13...

Election 2024 : मुंबई शहरात सरासरी 52.69 टक्के मतदान; 25 पैकी 13 लाख मतदारांनी केले मतदान

Subscribe

मुंबई शहरातील दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी 52.69 टक्के मतदान झाले आहे. शहरात एकूण 25 लाख 41 हजार 810 मतदार आहेत, पण सायंकाळी सहा वाजेपर्यंत फक्त 13 लाख 39 हजार 299 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 20 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबई शहरासह राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदान घेण्यात आले. मुंबई शहरातील दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी 52.69 टक्के मतदान झाले आहे. शहरात एकूण 25 लाख 41 हजार 810 मतदार आहेत, पण सायंकाळी सहा वाजेपर्यंत फक्त 13 लाख 39 हजार 299 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये पुरुष मतदार 7 लाख 10 हजार 174, स्त्री मतदार 6 लाख 29 हजार 049 आणि इतर 76 मतदारांनी मतदान केले. (Mumbai city recorded an average voter turnout of 52.69 percent in the assembly elections)

हेही वाचा – Mahavikas Aaghadi : निकालाआधीच मविआची रणनीती; मुंबईतील हॉटेलमध्ये बैठकीला सुरुवात

- Advertisement -

10 मतदारसंघातील एकूण मतदान आणि मतदानाची टक्केवारी

178 – धारावी विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लाख 31 हजार 020 मतदारांनी मतदान केले. यात पुरुष मतदार 71 हजार 176, स्त्री मतदार 59 हजार 832 आणि इतर 12 मतदारांनी मतदान केले. या मतदार संघाची 50.03 टक्केवारी आहे.

179 – सायन कोळीवाडा, विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लाख 51 हजार 711 मतदारांनी मतदान केले. यात पुरुष मतदार 82 हजार 383, स्त्री मतदार 69 हजार 314 आणि इतर 14 मतदारांनी मतदान केले आहे. त्यामुळे या मतदार संघातील टक्केवारी 53.56 एवढी आहे.

- Advertisement -

180 – वडाळा विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लाख 18 हजार 445 मतदारांनी मतदान केले. यात पुरुष मतदार 61 हजार 396 , स्त्री मतदार 57 हजार 048 आणि इतर एका मतदाराने मतदान केले आहे. त्यामुळे या मतदारसंघाची टक्केवारी 57.67 एवढी आहे.

181 – माहीम विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लाख 33 हजार 343 मतदारांनी मतदान केले. यात पुरुष मतदार 67हजार 352 ,स्त्री मतदार 65 हजार 964 आणि इतर 27 मतदारांनी  मतदान केले आहे. त्यामुळे या मतदारसंघाची टक्केवारी 59.01 एवढी आहे.

182 – वरळी विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लाख 41 हजार 585 मतदारांनी मतदान केले. यात पुरुष मतदार 75 हजार 699, स्त्री मतदार 65 हजार 882 आणि इतर 4 मतदारांनी मतदान केले आहे. त्यामुळे या मतदारसंघाची टक्केवारी 53.53 एवढी आहे.

183 – शिवडी विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लाख 52 हजार 880 मतदारांनी मतदान केले. यात पुरुष मतदार 80 हजार 848, स्त्री मतदार 72 हजार 028 आणि इतर 4 मतदारांनी मतदान केले आहे. त्यामुळे या मतदारसंघाची टक्केवारी 55.52 एवढी आहे.

184 – भायखळा विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लाख 37 हजार 244 मतदारांनी मतदान केले. यात पुरुष मतदार 72 हजार 576, स्त्री मतदार 64 हजार 665 आणि इतर 3 मतदारांनी मतदान केले आहे. त्यामुळे या मतदारसंघाची टक्केवारी 53.02 एवढी आहे.

185 – मलबार हिल विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लाख 37 हजार 195 मतदारांनी मतदान केले. यात पुरुष मतदार 71 हजार 349, स्त्री मतदार 65 हजार 844 आणि इतर 2 मतदारांनी मतदान केले आहे. त्यामुळे या मतदारसंघाची टक्केवारी 52.53 एवढी आहे.

186 – मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लाख 17 हजार 986 मतदारांनी मतदान केले. यात पुरुष मतदार 63 हजार 568, स्त्री मतदार 54 हजार 414 आणि इतर 4 मतदारांनी मतदान केले आहे. त्यामुळे या मतदारसंघाची टक्केवारी 48.76 एवढी आहे.

187 – कुलाबा विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लाख 17 हजार 890 मतदारांनी मतदान केले. यात पुरुष मतदार 63 हजार 827, स्त्री मतदार 54 हजार 058 आणि इतर 5 मतदारांनी मतदान केले आहे. त्यामुळे या मतदारसंघाची टक्केवारी 44.44 एवढी आहे.

हेही वाचा – Nana Patole : मुंबईला लुटणाऱ्या गौतम अदानींना हिशोब चुकता करावा लागेल; पटोलेंचा इशारा


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -