घरताज्या घडामोडीMumbai Corona Update : मुंबईकरांना दिलासा, २४ तासात २९९ कोरोनाबाधितांची नोंद

Mumbai Corona Update : मुंबईकरांना दिलासा, २४ तासात २९९ कोरोनाबाधितांची नोंद

Subscribe

मुंबईत एकूण ७ लाख ३४ हजार ४१८ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईतील कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मुंबईत मागील २४ तासात २९९ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये कमालीची घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या मुंबईत एकूण ५ हजार ३९७ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे. मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे मुंबईतील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली आहे. मुंबईत कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी मुंबईचा समावेश हा तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये मुंबईचा समावेशही तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. मुंबईत एकूण ७ लाख ३४ हजार ४१८ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत ७ लाख १० हजार ८४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत मागील २४ तासात ५०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १५ हजार ७८४ कोरोनाबाधितांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा दर ९७ टक्क्यांवर आला आहे. १९ जुलै ते २५ जुलै २०२१ पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०५ टक्क्यांवर आला आहे. मुंबईतील दुप्पटीचा दर १३२४ झाला आहे. मुंबईकरांना कोरोनाच्या प्रादुर्भावामधून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ६ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ६ पुरुष व २ रुग्णांचे वय ४० वर्षा खाली होते. ६ रुग्णांचे वय ६० वर्षा वर होते. उर्वरित १ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते. मुंबईतील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली असली तरी सक्रिय कंटेनमेंट झोन ३ असून ६० इमारती सीलबंद करण्यात आल्या आहेत. मुंबईत मागील २४ तासात २४ हजार १८९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत ७९ लाख ९० हजार ३१९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -