Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Mumbai Corona Update: मुंबईत पुन्हा रूग्णवाढीचा ट्रेंड सुरू, २४ तासात ५ हजार...

Mumbai Corona Update: मुंबईत पुन्हा रूग्णवाढीचा ट्रेंड सुरू, २४ तासात ५ हजार कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत कोरोना रुग्णांच्या दुप्पटीचा दर हा ७४ दिवसांवर

Related Story

- Advertisement -

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील परिस्थिती चिंताजनक झाली होती. परंतु आता मुंबईकरांना कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये दिलासा मिळाला आहे. आज मुंबईत गेल्या २४ तासात ४ हजार ९६६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मागील काहिदिवसांपासून होणाऱ्या रुग्णांच्या नोंदीमध्ये आजचा आकडा कमी असल्याने दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासात कोरोनामुळे ७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत ६ लाख ४० हजार ५०७ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ६४ हजार ५८२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

मुंबईत आज एकूण ५३०० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत ५ लाख ६० हजार ४०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाची चेन रोखण्यासाठी मुंबईत ब्रेक द चेन मोहिम राबविली जात आहे. यामध्ये कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. आज ३९ हजार १३५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. फक्त मुंबईत आतापर्यंत १२ हजार ९९० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

मुंबईत कोरोना रुग्णांच्या दुप्पटीचा दर हा ७४ दिवसांवर गेला आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आज कोरोनाबाधित रुग्णांच्या नोंद झाल्या आहेत त्यापेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात १८ वर्षांवरील नागरिकांना मोफत लसीकरण

- Advertisement -

राज्यात येत्या १८ ते ४५ वर्षांच्या नागरिकांना मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यानंतर माध्यमांशी बोलताना राज्यात सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मात्र लगेच मोठ्या प्रमाणावर लस मिळणार नसल्याने राज्यात १ मे रोजी लसीकरण करण्यात येणार नसल्याचं सांगितलं. मे अखेरीपर्यंत लस मिळाली तर लसीकरण करता येईल, असं सांगतानाच लसीकरणासाठी वयोगटाचे टप्पे करण्याचा विचार सुरू आहे. त्यानुषंगाने प्रत्येकाला लस मिळेल. त्यासाठी प्रत्येक वयोगटानुसार केंद्र तयार केले जाणार असल्याची माहिती टोपेंनी दिली. तसेच येत्या सहा महिन्यात हे लसीकरण पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे, असं टोपे यांनी सांगितलं.

- Advertisement -