घरताज्या घडामोडीMumbai Corona Update: मुंबईत कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ, २४ तासात ५७५ नव्या...

Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ, २४ तासात ५७५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Subscribe

सध्या मुंबईत ८ हजार २९७ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत

मुंबईत बऱ्याच दिवसानंतर शनिवारी कोरोनामुक्त होणाऱ्या नागरिकांच्या संख्ये वाढ झाली आहे. जुलैच्या सुरुवातीपासूनच कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली असून कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळाला होता तसेच कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही वाढ झाली होती. मागील २४ तासात ५७५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. एकूण ८५१ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येत चढ उतारच पाहायला मिळत असून मागील २४ तासात एकूण २१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या आता ७ लाखांवर पोहचली आहे.

मुंबईत एकूण ७ लाख २४ हजार १३० कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून मागील २४ तासात ५७५ कोरोनाबाधितांची नोंद समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत ६ लाख ९७ हजार ९९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईत ८ हजार २९७ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. मुंबईतील कोरोनामुळे १५ हजार ५२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबई पालिका क्षेत्रात ३५ हजार ४९१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ७२ लाख ५५ हजार ३१८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

मुंबईत मागील २४ तासात मृत्यू झालेल्या २१ रुग्णांपैकी १७ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. १२ पुरुष व ९ रुग्ण महिला होते. १२ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. उर्वरित ९ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते. मुंबईतील कोरोनाबाधितांचा बरा होण्याचा दर ९६ टक्क्यांवर पोहचला आहे. तर करोना रुग्ण दुप्पटीचा दर ७५२ दिवसांवर गेला असल्यामुळे दिलासादायक बाब आहे. सध्या मुंबई पालिका क्षेत्रातील ६६ इमारती सील करण्यात आल्या आहेत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -