घरमहाराष्ट्रअलर्ट! आता मुंबईतही कोरोना वाढला, दोन दिवसांत आढळले 'एवढे' रुग्ण

अलर्ट! आता मुंबईतही कोरोना वाढला, दोन दिवसांत आढळले ‘एवढे’ रुग्ण

Subscribe

कोरोना व्हायरस संकट गेलं म्हणून सुटकेचा श्वास सोडणाऱ्या मुंबईकरांना पुन्हा एकदा चिंतेत टाकणारी बातमी आहे.

कोरोना व्हायरस संकट गेलं म्हणून सुटकेचा श्वास सोडणाऱ्या मुंबईकरांना पुन्हा एकदा चिंतेत टाकणारी बातमी आहे. मुंबईत कोरोना पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाल्याचं चित्र दिसून येत आहे. दिवसेंदिवस मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त होतेय. त्यामुळेच मुंबईतल्या अनेक दवाखान्यांमध्ये कोरोना वॉर्ड पुन्हा सुरु करण्यात आलेले आहेत.

कोरोनाचा प्रसार वाढल्याने राज्यात 9 जिल्हे तर मुंबईमध्ये 24 विभागापैकी 6 विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. मुंबईत २८ मार्चपर्यंत कोरोनाचे ६६३ रूग्ण आढळून आले आहेत. मुंबईतील कुलाबा, ग्रँट रोड, परळ आणि प्रभादेवी या प्रभागांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईमध्ये सध्या एन्फ्ल्यूएंझाचे १४ रुग्ण दाखल असून त्यामध्ये ‘एच३ एन२’चे ९ तर ‘एच१ एन१’ चे पाच रुग्ण आहेत.

- Advertisement -

गेल्या दोन दिवसांत सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. धक्कादायक बाब म्हणजे कोरोना रूग्णांची संख्या दुपट्टीने वाढू लागली आहे. तर ठाण्यात कोरोनाच्या ‘XBB1.16’ या नव्या व्हेरिएंटचा प्रवेश झालाय. मार्चमध्ये सर्वाधिक रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. मागील काही दिवसांतच अ‍ॅक्‍टिव्ह रुग्णसंख्या ही २५०६ पर्यंत पोहोचली आहे. आज दिवसभरात तीन कोरोना रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. विमानतळावर परदेशातून आलेल्या प्रवाशांचे स्क्रीनिंग सुरु आहे.

कोरोना वॉर्डांमध्ये व्हेंटिलेटर सपोर्टसह इतर सुविधा सज्ज करण्यात आलेल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात कोरोना गतीने वाढत आहे. राज्यामध्ये अॅक्टिव्ह रुग्णसंख्या दोन हजारांपेक्षा जास्त असून आकड्यांनुसार मार्चमध्ये पहिल्यांदा सक्रीय रुग्णसंख्या दोन हजारांपेक्षा जास्त झाली आहे.

- Advertisement -

मुंबईमध्ये बीएमसीने बेडच्या संख्येमध्ये वाढ केली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोर्डवर आहे. राज्यात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे की, श्वास घेण्यास त्रास, ताप आणि खोकला 5 दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. गंभीर लक्षणे किंवा उच्च ताप असलेल्या रुग्णांच्या बाबतीत पाच दिवसांसाठी रेमडेसिव्हिर औषधं घेतलं जाऊ शकतं पण, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -