घरताज्या घडामोडीMumbai Corona Update: मुंबईत पुन्हा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली, गेल्या २४ तासात...

Mumbai Corona Update: मुंबईत पुन्हा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली, गेल्या २४ तासात ६६६ कोरोनाबाधितांची नोंद

Subscribe

मुंबईत सध्या १४ हजार ८०७ सक्रिय कोरोना रुग्ण

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ६६६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकुण २० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू मागील २३ तासात झाला आहे. मुंबईत पालिका क्षेत्रात एकुण ७४१ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत आतापर्यत एकुण ७ लाख १९ हजार १७९ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर मृत्यूची संख्या १५ हजार २४७ झाली आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमध्ये दररोज घट होताना दिसत आहे. बुधवारच्या तुलनेत मृत्यूची संख्या वाढली आहे. ३१ मे पासून मुंबईतील कोरोनाबाधितांची एक हजार संख्येच्या खाली नोंद करण्यात आली आहे. मुंबईत सध्या १४ हजार ८०७ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत ६ लाख ८६ हजार ८६६ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत मागील २४ तासात २९ हजार ३०९ कोरोना चाचण्या २४ तासात करण्यात आल्या आहेत. महानगरपालिका क्षेत्रात एकुण ६७,२३,२१९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांच्या दुप्पटीचा दर ७३४ दिवांचा झाला आहे.

- Advertisement -

मुंबईत सध्या १८ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. मुंबईती कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्यामुळे मुंबईकरांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कायम आहे. कोरोनाची तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव लहान मुलांना जास्त असल्यामुळे मुबंईत आरोग्य विभागाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. मृत्यू झालेल्यांपैकी १३ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. १० पुरुष व १० रुग्ण महिला होते. ४ रुग्णांचे वय ४० वर्षा खाली होते. ०९ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. उर्वरित ७ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -