घरमहाराष्ट्रदेशात पुन्हा कोरोना फैलावतोय! मुंबईसह राज्यामध्ये एका दिवसात आढळले 'एवढे' रुग्ण

देशात पुन्हा कोरोना फैलावतोय! मुंबईसह राज्यामध्ये एका दिवसात आढळले ‘एवढे’ रुग्ण

Subscribe

देशात कोरोना संसर्गाच्या वेगाला कोणताही ब्रेक दिसत नाही. जाणून घ्या राज्य आणि मुंबईच्या परिस्थितीबाबत...

देशात कोरोना संसर्गाच्या वेगाला कोणताही ब्रेक दिसत नाही. एका दिवसात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांनी तीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशभरात गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूचे ३,०१६ रुग्ण आढळले आहेत. गेल्या सहा महिन्यांतील ही सर्वाधिक कोरोना रूग्णसंख्या असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी २ ऑक्टोबर रोजी कोरोनाचे ३,३७५ रुग्ण आढळले होते.

महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाले तर, गुरुवारी राज्यात कोरोनाचे ६९४ नवीन रुग्ण आढळले. या काळात कोरोनामुळे कोणाचा मृत्यू झाल्याची बातमी अद्याप आलेली नाही. राज्यातील कोरोनाच्या दैनंदिन आकडेवारीत ६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. चार आठवड्यांपूर्वी महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह दर १.०५ टक्के होता, जो २२ मार्च ते २८ मार्च दरम्यान ६.१५ टक्के झाला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा: कोविड पॉझिटिव्ह असूनही खासदाराने ट्रेनमधून केला प्रवास, ३० दिवसांसाठी निलंबित

तसंच मुंबईतही कोरोना रूग्णसंख्या दुप्पटीने वाढत चालली आहे. हा आलेख सातत्याने वाढत आहे. आज शहरात कोरोनाचे १९२ नवे रुग्ण आढळले असून, त्यामुळे शहरातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ८४६ झाली आहे. मुंबईतील रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ५५ वर पोहोचली आहे. या ५५ रुग्णांपैकी २८ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा: “प्रभू श्रीरामांचं नाव घेऊन….” राम नवमीच्या दिवशी उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा

महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगलीमध्ये कोरोनाची स्थिती अत्यंत वाईट आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह दर अनुक्रमे २०.५ टक्के आणि १७.४७ टक्के झाला आहे. याशिवाय कोल्हापुरात १५.३५ टक्के, पुणे १२.३३ टक्के, नाशिक ७.८४ टक्के आणि अहमदनगरमध्ये ७.५६ टक्के कोरोना पॉझिटिव्हिटी रेट आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता महाराष्ट्रातील सर्व विमानतळांवर RT-PCR चाचण्या सातत्याने केल्या जात आहेत. राज्यात आतापर्यंत १७.७९ कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -