घरताज्या घडामोडीCorona Virus : अतुल भातखळकरांना कोरोनाची लागण, ट्वीट करत दिली माहिती

Corona Virus : अतुल भातखळकरांना कोरोनाची लागण, ट्वीट करत दिली माहिती

Subscribe

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. अशामध्ये मुंबईतील लग्न सोहळ्यांना आणि बैठकांना नेते मंडळी उपस्थिती लावत आहे. यामुळे नेत्यांनाच कोरोनाची लागण झाली आहे.

भाजप नेते अतुल भातखळकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात आणि मुंबईत कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढला आहे. कोरोनच्या तिसऱ्या लाटेचे संकेत येत आहेत. दरम्यान या तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना, मंत्र्यांना आणि आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच भाजपच्या नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. भाजपचे आक्रमक नेते अतुल भातखळकर यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत असून आता आयसोलेशनमध्ये असल्याची माहिती भातखळकर यांनी दिली आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. अशामध्ये मुंबईतील लग्न सोहळ्यांना आणि बैठकांना नेते मंडळी उपस्थिती लावत आहे. यामुळे नेत्यांनाच कोरोनाची लागण झाली आहे. भाजप आमदार अतुल भातखळकरही मुंबईत बैठका आणि लग्न सोहळ्यांना उपस्थित राहिले होते. तसेच अधिवेशनादरम्यान अनेकांच्या संपर्कातही आले होते. अधिवेशनानंतर आमदारांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आले आहे.

- Advertisement -

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वतः ट्वीट करुन दिली आहे. भातखळकर म्हणाले की, माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल +ve आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयसोलेशनमध्ये आहे. गेल्या दोन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी. असे आवाहनही अतुल भातखळकर यांनी केली आहे.

- Advertisement -

भाजप नेत्या पंकजा मुंडेंना कोरोनाची लागण

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा मुंडे यांच्यावर मुंबईतील निवासस्थानी उपचार करण्यात येत आहे. पंकजा मुंडे यांना ओमिक्रॉनची लागण झाली असल्याची माहिती देण्यात येत आहे. त्यांच्यासह त्यांच्या मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरु असून काळजी घेण्याचे कोणतेही कारण नसल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आवाहनही पंकजा मुंडेंनी केले आहे. यापू्र्वी भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली होती. तर खासदार सुजय विखे पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मोठ्या संख्येने राज्यातील नेत्यांना कोरोनाची लागण झाली असल्यामुळे काळजी व्यक्त करण्यात येत आहे.


हेही वाचा : Corona positive : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार कोरोना पॉझिटिव्ह

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -