परमबीर सिंह यांच्या अडचणीत भर, क्राईम ब्रँचकडून खंडणीच्या गुन्ह्यात नोटीस जारी

mumbai crime branch send notice to parambir singh in extortion case
परमबीर सिंह यांच्या अडचणीत भर, क्राईम ब्रँचकडून खंडणीच्या गुन्ह्यात नोटीस जारी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना मुंबई क्राईम ब्रँच कडून खंडणीच्या गुन्ह्यात नोटीस पाठवण्यात आली आहे. हि नोटीस त्याच्या मुंबईतील वाळकेश्वर येथील घरी पाठवण्यात आलेली असून १२ ऑक्टोबर रोजी त्यांना गुन्हे शाखा कक्ष ११च्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सचिन वाजेसह इतरांवर काही महिन्यापूर्वी गोरेगाव पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास मुंबई गुन्हे शाखा कक्ष ११ कडे तपासासाठी देण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखा कक्ष ११ मधील अधिकारी यांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला आहे. याप्रकरणी परमबीर सिंह यांना या गुन्ह्यासंदर्भात शनिवारी नोटीस जारी करण्यात आली आहे. परमबीर सिंह यांच्या मुंबईतील वाळकेश्वर येथील घरी नोटीस पाठवण्यात आलेली असून १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता कक्ष ११ च्या कांदिवली येथील कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. गुन्हे शाखेकडून पाठवण्यात आलेल्या नोटिसी मुळे परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी एक भर पडली आहे.

गेल्या काही दिवसात परमबीर सिंह हे नॉन रिचेबल असून ते कोणाच्याही संपर्कत नाही त्यामुळे ते मुंबई महाराष्ट्र मधून परदेशात पळून गेल्याचा संशय पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी केंद्र सरकारच्या संपर्कात असून सिंह यांनी चौकशीला सामोरे जावे असे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यांची होमगार्डच्या महासंचालक पदी बदली झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना १०० कोटी हप्ता वसूलीचे टार्गेट दिले होते असा लेटर बॉम्ब ठाकरे सरकारवर टाकला होता. त्यानंतर ६ हून अधिक प्रकरणात परमबीर ३ पोलीस उपायुक्त आणि डझनभर पोलीस अधिकारी यांच्या सिंडिकेटबद्दल राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये धमकावणे आणि खंडणीचे गुन्हे दाखल झाले आहेत.


हेही वाचा : परमबीर सिंह बनावट पासपोर्टद्वारे भारतातून पळाल्याचा तपास यंत्रणांना संशय