घरमहाराष्ट्रCSMT ला येणार नवी झळाळी,पुनर्विकासासाठी कोणत्या कंपन्या ठरल्या पात्र?

CSMT ला येणार नवी झळाळी,पुनर्विकासासाठी कोणत्या कंपन्या ठरल्या पात्र?

Subscribe

हेरिटेज असणार्‍या इमारतीचे रूप काही दिवसात पालटणार आहे. सध्या या रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास होणार आहे. यासाठी अनेक मोठ्या दिग्गज कपन्यांची 'आरएकक्यू' निविदा प्रक्रियेत निवड करण्यात आली

मुंबई मधील सर्वात जुने व मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असणारे रेल्वे स्थानक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. हेरिटेज असणार्‍या इमारतीचे रूप काही दिवसात पालटणार आहे. सध्या या रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास होणार आहे. यासाठी अनेक मोठ्या दिग्गज कपन्यांची ‘आरएकक्यू’ निविदा प्रक्रियेत निवड करण्यात आली असल्याचे भारतीय रेल्वे विकास महामंडळाचे (आयआरएसडीसी)मुख्य कार्यकारी अधिकारी एस.के.लोहिया यांनी माहिती दिली आहे. सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी डिझाइन-बिल्ड – ऑपरेटर-फायनान्स-ट्रान्सफर(डीबीएफओटी)मॉडेलवर तब्बल 1हजार 642 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे.तसेच मध रेल्वेचे मुख्यालय असणार्‍या आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सामील असणार्‍या सीएसटीएम स्थानकाच्या परिसरातील इमारतींचा पुनर्विकास केला जाणार असल्याचे बोलण्यात येत आहे. या ठिकाणी आयकॉनिक सिटी सेंटर उभारण्यात येणार आहे. तसेच 99 वर्षाच्या रहिवासी इमारत तर गैर रहिवासी इमारती 60 वर्षाच्या भाडे तत्व करारावर देण्यात येणार आहे. आणि यासाठी कमर्शियल डेवलपमेंट या योजने अंतर्गत 2.54 लाख चौरस मीटरपरिणत बिल्टअप एरियाची परवानगी सुद्धा देण्यात आलीये.

मुंबई विमानतलवार असणार्‍या सोयी सुविधा प्रमाणेच रेल्वे स्थानक करण्याचा विचार रेल्वे प्रशासनातर्फे मांडण्यात आला आहे.

- Advertisement -

या आहेत 9 कंपन्या

ऑगस्ट 2020 मध्ये खासगी कंपन्यांना आमंत्रित करण्यात आले होते. तर, 15 जानेवारी 2021 रोजी CSMT च्या पुनर्विकासाच्या कामाला एकूण 10 खासगी कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. यापैकी 9 कंपन्या पात्र ठरल्या असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये मेसर्स गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड, मेसर्स एकोरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट्स होल्डिंग्स लिमिटेड, मेसर्स ओबेरॉय रियल्टी लिमिटेड, मेसर्स आयएसक्यू आशिया इफ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स अदानी रेल्वे ट्रान्सपोर्ट लिमिटेड, मेसर्स कल्पतरु पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड, मेसर्स जीएमआर इंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स मोरीबस होल्डिंग्स पीटीई लिमिटेड आणि मेसर्स बीआयएफ-IV इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंग डीआईएफसी प्रायव्हेट यांची निवड झाली आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवेशाबाबत विजय वड्डेटीवार यांची मोठी घोषणा !

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -