घरताज्या घडामोडीBulli Bai App Controversy: बंगळुरूनंतर उत्तराखंडमधून एक महिला ताब्यात, मुंबई सायबर सेलची...

Bulli Bai App Controversy: बंगळुरूनंतर उत्तराखंडमधून एक महिला ताब्यात, मुंबई सायबर सेलची मोठी कारवाई

Subscribe

मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात बुल्ली बाई अॅपचं प्रकरण मोठ्या प्रमाणात रंगत आहे. या प्रकरणात काल (सोमवार) मुंबई सायबर पोलिसांनी बंगळुरू येथून २१ वर्षीय इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. या इंजिनियरिंग करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव विशाल झा असं आहे. विशाल कुमार झा या आरोपीला मुंबई सायबल सेलच्या पोलिसांनी आज(मंगळवार) अटक केली आहे. परंतु बंगळुरूनंतर आता उत्तराखंडमधून एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करून त्यांची बोली लावून त्यांना बदनाम करण्याचं काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, मुंबई सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन दिवसांमध्येच या आरोपींना शोधून काढलं आहे. त्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

- Advertisement -

मुंबई पोलिसांनी बुल्ली बाई प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या एका महिलेला ताब्यात घेतले आहे. ज्यामध्ये मुस्लिम महिलांचे फोटो लिलावासाठी अॅपवर अपलोड करण्यात आले होते, उत्तराखंडमधून ट्रान्झिट रिमांडसाठी महिलेला तपासासाठी मुंबईत आणण्यात आले आहे.

- Advertisement -

२१ वर्षीय इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्याला पोलिसांनी बंगळुरू येथून सोमवारी ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणातील ही दुसरी अटक आहे. दोघे या प्रकरणातील सहआरोपी असून एकमेकांना ओळखतात. हे दोन्ही आरोपी फेसबुक आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मित्र आहेत. म्हणून दुवे स्थापित करण्यात आले आहेत. ही महिला बुल्लीबाई अॅप वादाशी संबंधित तीन खाती हाताळत होती. तसेच सहआरोपी विशाल कुमार झा खालसा सुप्रिमिस्ट नावाने खाते उघडले होते.

हा कार्यक्षमतेतील फरक 

इंटरनेटवर बुल्लीडील ॲप उघडून करून मुस्लिम महिलांची विक्री करणाऱ्या माणसाला मुंबई पोलिसांनी दोन दिवसात अटक केली. सुल्लीडीलमार्फत हेच घाण काम करणाऱ्याला दिल्ली पोलीस सहा महिने शोधतायत. हा कार्यक्षमतेतील फरक आहे, अशी ट्विट राज्याचे गृहनिर्माण जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

या प्रकरणात मुंबई पोलिसांना पहिलं यश आलं असल्याचं ट्विट राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केलं आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू असून अटक करण्यात आलेल्या व्यक्तिची ओळख जाहीर केल्यास प्रकरणाच्या चौकशीला बाधा येऊ शकते, असं सतेज पाटलांनी म्हटलं आहे.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -