Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र डॉक्टर शीतल आमटेंच्या 'टॅब'चा पासवर्ड पोलिसांना सापडेना,आत्महत्येमागचे गूढ कायम

डॉक्टर शीतल आमटेंच्या ‘टॅब’चा पासवर्ड पोलिसांना सापडेना,आत्महत्येमागचे गूढ कायम

शीतलच्या टॅबचा Eye पासवर्ड शोधण्यात मुंबई सायबर पोलिसांना अपयश मिळाले आहे. यामुळे शीतल यांच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायम आहे.

Related Story

- Advertisement -

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात व महारोगी सेवा प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर शीतल आमटे करजगी यांच्या आत्महत्येला चार महिने उलटून गेले आहेत. पण अद्याप त्यांनी आत्महत्या का गेली याचा गुंता सुटलेला नाही. यामुळे शीतल यांच्या टॅबमधून काही महत्वाची माहिती मिळेल अशी आशा पोलिसांना होती. पण त्यांच्या टॅबचा Eye पासवर्ड शोधण्यात मुंबई सायबर पोलिसांना अपयश मिळाले आहे. यामुळे शीतल यांच्या मृत्यूचे गूढ मात्र अद्यापही कायम आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांना पासवर्ड शोधण्यात अपयश मिळाल्याने पुण्यातील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे हा पासवर्ड शोधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

शीतल यांनी आनंदवन येथे ३० नोव्हेंबर २०२० रोजी स्वत:ला विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केली होती. या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. शीतल यांनी कौटुंबिक कलहातूनच हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात होते. पण आमटे कुटुंबांनी मात्र यावर काही दिवस मौन पाळले आणि नंतर शीतलची मानसिक अवस्था स्थिर नसल्याचे सांगितले होते. यामुळे शीतलच्या मृत्यूचे गूढ अधिक वाढले होते. शीतल टेक्नोसेव्ही होत्या. यामुळे विविध गॅझेट त्या वापरायच्या. यामुळेच पोलिसांनी त्यांचा लॅपटॉप, मोबाईल, टॅब यांसह त्यांचे इतर गॅझेट्सही ताब्यात घेतले होते. पण मृत्यूपूर्वी शीतल यांनी पासवर्ड बदलले. काहींना त्यांनी स्वत:च्या डोळ्यांचे पासवर्ड ठेवले होते. ज्याबद्दल त्यांचे पती गौतम करजगी यांनाही काही माहीत नव्हते. मात्र मुंबई सायबर पोलीस हा पासवर्ड क्रेक करतील व शीतल आत्महत्याप्रकरणात महत्वपूर्ण माहिती मिळेल असे शीतलच्या निकटवर्तियांना वाटले होते.

- Advertisement -